Special team and police during breathalyzer examination of notorious gangster and accused Abu Salem before taking him to the train compartment. esakal
नाशिक

Abu Salem News : कुख्यात गँगस्टर अबु सालेम रेल्वेने कडेकोट बंदोबस्तात दिल्लीकडे रवाना! न्यायालयीन कामकाजानंतर परत आणणार

Gangster Abu Salem Taken to Delhi : दिल्ली येथील न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या कामकाजानंतर अबू सालेम यास परत आणले जाईल, असे नाशिक मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने स्पष्ट केले.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : काही आठवड्यांपूर्वीच नवी मुंबईच्या तळोजा कारागृहातून नाशिक मध्यवर्ती कारागृहात दाखल झालेला कुख्यात गँगस्टर व मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेम यास गुरुवारी (ता. १) पहाटे कडेकोट बंदोबस्तामध्ये रेल्वेने दिल्ली येथे नेण्यात आले.

याबाबत कारागृह प्रशासन व पोलिसांकडून कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती. दिल्ली येथील न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या कामकाजानंतर अबू सालेम यास परत आणले जाईल, असे नाशिक मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने स्पष्ट केले. (gangster Abu Salem left to Delhi under strict security for court proceedings)

कुख्यात गँगस्टर व आरोपी आबू सालेम यास नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर आणण्यापूर्वी असलेला कडेकोट पोलीस बंदोबस्त.

गेल्या जुलै महिन्याच्या मध्यात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आबू सालेम यास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आलेले होते. सालेम सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे तर अन्य गंभीर स्वरुपाचे खटलेही प्रलंबित आहेत. त्यातील काही खटल्यांची सुनावणी दिल्ली येथील न्यायालयात सुरू आहे.

या संदर्भातील सुनावणीसाठी गुरुवारी (ता. १) पहाटे अडीच वाजेच्या सुमारास आरोपी आबू सालेम यास कडेकोट बंदोबस्तामध्ये नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून नाशिकरोड रेल्वेस्टेशन येथे आणण्यात आले. यावेळी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर स्थानिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.

तर सालेम यास मध्यवर्ती कारागृहातून रेल्वे स्टेशनपर्यंत विशेष सशस्त्र सुरक्षा रक्षकाच्या गराड्यात आणण्यात आले. त्यानंतर दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेतून त्यास कडेकोट बंदोबस्तामध्ये नेण्यात आले. यासंदर्भात शहर पोलीस आणि कारागृह प्रशासनाकडून कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती. (latest marathi news)

सुरक्षेच्या कारणास्तव नाशिकमध्ये

अबू सालेम याच्यावर मुंबईतील ऑर्थर रोड जेलमध्ये हल्ला झाल्यानंतर त्यास नवी मुंबईतील तळोजा कारागृहात दाखल करण्यात आले होते. परंतु तळोजा कारागृहाच्या दुरूस्तीच्या कामानिमित्ताने व सुरक्षात्मक दृष्टिकोनातून त्यास नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले होते.

त्यानुसार, अबू सालेम यास १० ते १५ जुलै या दरम्यान अत्यंत गुप्तता बाळगत व कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले. येथील अतिसुरक्षात्मक असलेल्या अंडासेलमध्ये आबु सालेम यास ठेवण्यात आले असून, त्याच्या सेलबाहेर दोन अधिकाऱ्यांची २४ तास नेमणूक करण्यात आलेली आहे. (latest marathi news)

‘शिफ्टिंग’चे वृत्त निराधार

आरोपी आबू सालेम यास न्यायालयीन कामकाजानिमित्ताने दिल्ली येथे नेण्यात आले असून, तेथील कामकाज आटोपल्यानंतर त्यास पुन्हा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आणण्यात येणार आहे. त्यामुळे सालेम यास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून हलविण्यात आल्याचे वृत्त निराधार असून, कारागृह प्रशासनाने ते फेटाळून लावले आहे.

"नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून आरोपी आबू सालेम यास हलविण्यात आलेले नाही, तर न्यायालयीन कामकाजानिमित्ताने त्यास दिल्ली येथे नेण्यात आले आहे. दोन-तीन दिवसात त्यास परत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आणण्यात येईल."

- अरुणा मुगुटराव, अधीक्षक, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT