Chhagan Bhujbal NDCC Bank esakal
नाशिक

Chhagan Bhujbal News : ‘आर्मस्ट्राँग’कडून NDCCला एकरकमी सेटलमेंटचा प्रस्ताव!

जिल्हा बँक सध्या आर्थिक अडचणीत असल्याने प्रशासक प्रतापसिंग चव्हाण यांनी काही कठोर पावले उचलली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने भुजबळ कुटुंबीयांच्या मालकीच्या दाभाडी येथील ‘आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेट’ या कंपनीविरोधात कायदेशीर कारवाईचा बडगा उगारताच भुजबळ कुटुंबीयांनी तडजोडीची भूमिका स्वीकारली आहे. यासंदर्भात भुजबळ यांनी जिल्हा बँकेच्या प्रशासकांशी संपर्क साधून एकरकमी सेटलमेंट करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे बॅंकेला मोठा दिलासा मिळणार आहे. (nashik Chhagan Bhujbal NDCC Bank marathi news)

जिल्हा बँक सध्या आर्थिक अडचणीत असल्याने प्रशासक प्रतापसिंग चव्हाण यांनी काही कठोर पावले उचलली आहेत. मोठ्या थकबाकीदारांविरुद्ध थेट कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. यातून कोट्यवधींच्या कर्ज थकीत प्रकरणी जिल्हा बँकेकडे तारण असलेल्या मालेगावातील द्याने येथील रेणुकादेवी औद्योगिक सहकारी संस्थेच्या मालमत्तेचा लिलाव केला जाणार असून, त्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे.

दाभाडी येथील आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर विरोधात बँकेने कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. गेल्या महिन्यात या प्रकरणी भुजबळ कुटुंबीयांना नोटीस पाठवली होती. या साखर कारखान्याकडील ५१ कोटी ६६ लाख रुपयांची थकबाकी आहे. बॅंकेने वर्तमानपत्रात यापूर्वीच सहकार अधिनियमान्वये नोटीस प्रकाशित केली आहे.

येथे ३१ मार्च २०२४ पर्यंत संबंधित संस्थेच्या कर्जाची परतफेड न केल्यास कारखान्याच्या दाभाडी येथील सर्वे क्रमांक १५९ या ३३.४९ एकर जमिनीचा लिलाव करून संबंधित कर्जाची वसुली करण्यात येणार आहे. बँकेने कारवाईचा बडगा उगारताच भुजबळ कुटुंबीयांनी तडजोडीची भूमिका स्वीकारली आहे.

यासंदर्भात भुजबळ यांनी जिल्हा बँकेच्या प्रशासकांशी संपर्क करून एकरकमी सेटलमेंट करण्याचा प्रस्ताव दिला आहे. प्रशासन आणि आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यातील चर्चेनंतर ‘ओटीएस’ योजनेतून या कर्जाची परतफेड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेलाही मोठा थकबाकीदार यांबाबत आज एक दिलासा मिळाला. दोन दिवसांपूर्वीच राज्य शासनाने जिल्हा बँकेच्या प्रशासकांना याबाबतचे अधिकार बहाल केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT