Dindori Agricultural Produce Market Committee esakal
नाशिक

Nashik Onion Auction : दिंडोरी बाजार समितीत कांदा लिलाव पूर्ववत

Onion Auction : दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा खरेदी-विक्री व्यवहार प्रणाली पूर्ववत सुरु झाल्याने शेतकरी वर्गाकडून याचे स्वागत केले जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Onion Auction : लेव्हीच्या मुद्यावरुन जिल्ह्यातील बाजार समितीतील कांदा खरेदी विक्री व्यवहाराला लागलेले ग्रहण अखेर सुटले असून दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा खरेदी-विक्री व्यवहार प्रणाली पूर्ववत सुरु झाल्याने शेतकरी वर्गाकडून याचे स्वागत केले जात आहे. लेव्हीच्या मुद्यावरुन गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समित्यांतील कांदा खरेदी-विक्री बंद होती. (Nashik Onion auction cancelled in Dindori Bazar Committee marathi news)

त्यानंतर व्यापाऱ्यांनी खासगी जागेत कांदा मार्केट तीन-चार दिवसांपासून सुरु केल्याने त्या ठिकाणी कडकडीत ऊन व निवारा शेड अभावी कांदा विक्रेते व व्यापारी यांना उन्हाच्या तीव्रतेचा सामना करावा लागला. दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत कड, उपसभापती कैलास मवाळ यांनी ही बाब गांभीर्याने घेत संचालक मंडळाची तातडीने बैठक घेत शेतकरी हितासाठी बाजार समितीच्या बाजार आवारातच कांदा खरेदी विक्रीचा निर्णय घेत संबंधित व्यापाऱ्यांना लेव्ही, आडतची कपात न करता माल खरेदीच्या सूचना करीत संचालक मंडळाच्या ठरावाचे पत्र दिले. (latest marathi news)

तसेच शेतकऱ्यांनाही कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आणण्याचे आवाहन करीत सोमवार (ता.१५) पासून बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात कांदा खरेदी विक्री व्यवहार सुरु केले. लेव्हीचा निर्णय प्रलंबित असून शासन निर्णयानुसार त्याबाबत कार्यवाहीचा प्रतिक्षा असून तोपर्यंत शेतकरी व्यापारी व बाजार समिती यांची भूमिका समन्वयाची असून शेतकरी हित डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेतल्याची माहिती बाजार समितीचे सभापती कड यांनी दिली.

कांद्यास १३०० ते १६०० रुपये बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिंडोरी व वणी येथील कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु असून शेतकऱ्यांनी आपला कांदा विक्रीस आणण्याचे आवाहन समितीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT