Lasalgaon Onion auction held by Agriculture Produce Market Committee here. esakal
नाशिक

Nashik Onion Export : लासलगाव बाजार समितीत कांदा 800 रुपयांनी वधारला

Nashik News : कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारच्या तुलनेत उन्हाळ कांद्याच्या दरात क्विंटलमागे ७०० ते ८०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारच्या तुलनेत उन्हाळ कांद्याच्या दरात क्विंटलमागे ७०० ते ८०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शुक्रवारी (ता. ३) लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांदा कमीत कमी ७०० रुपये, जास्तीत जास्त १८०१ रुपये, तर सरासरी १५५१ रुपये दर होता. (Onion increased by Rs 800 in Lasalgaon market committee)

निर्यातबंदी उठवल्यानंतर उन्हाळ कांद्याला कमीत कमी ८०१ रुपये, जास्तीत जास्त २५५१, तर सरासरी भाव २१०० रुपये दर होता.

"निर्यात बंदीचा निर्णय मागे घेतला असला तरी त्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावलेले आहे आणि ५५० डॉलर निर्यात शुल्क असल्यामुळे प्रत्यक्षात शेतकऱ्यांना त्याचा काहीच फायदा होणार नाही. एकप्रकारे अघोषित निर्यातबंदीच आहे. शासनाने ४० टक्के निर्यात शुल्क व एमईपी तत्काळ रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा." - प्रवीण कदम, कांदा निर्यातदार, लासलगाव (Latest Marathi News)

"महाराष्ट्रातील कांदा उत्पादक क्षेत्र असलेला उत्तर महाराष्ट्र तसेच पश्‍चिम महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना फटका बसू नये, यासाठी अखेर कांदा निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे या दरम्यान कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या निर्णयावर ठाम राहणार आहे." - जयदत्त होळकर, माजी सभापती, लासलगाव बाजार समिती

"वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयामुळे कांद्याच्या बाजारभावात ८०० रुपयांची मोठी वाढ झाली. २ हजार रुपयांच्या आतील दर २५०० रुपयांच्या वर गेल्याने नक्कीच याचा शेतकऱ्यांना फायदा होतो." - सुवर्णा जगताप, पदाधिकारी, भाजप महिला आघाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आज अचानक उतरले सोन्याचे दर! किती हजारांनी स्वस्त झालं, पाहा एका क्लिकवर

India vs Pakistan Asia Cup : 'ऑपरेशन सिंदूर'वरून भारताला डिवचणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंनी किती धावा केल्या? पाहा स्कोअर कार्ड..

BJP Protest : मोदींच्या आईचा AI व्हिडिओ; भाजप महिला आघाडीचे काँग्रेसविरोधात आंदोलन

Latest Marathi News Updates : मुंबईतील ड्रंक एंड ड्राईव्ह प्रकरणातील जखमीचा मृत्यू, आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

Ahilyanagar Rain Update: 'नेवासे तालुक्‍यात धो-धो पाऊस; शेतकऱ्यांचे नुकसान', कांदा उत्पादकांची धावपळ

SCROLL FOR NEXT