nashik
nashik sakal
नाशिक

Nashik : कांद्याच्या भावात पाचशे रुपयांची उसळी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पश्‍चिम बंगाल, दिल्लीच्या बाजारपेठेत दक्षिण भारतातून पाठविलेला कांदा पावसामुळे खराब झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यातच पावसामुळे राजस्थानमधील कांद्याचे नुकसान झाल्याने सोमवार (ता. २०)पासून नाशिकच्या उन्हाळ कांद्याला देशांतर्गत मागणी वाढली आहे. परिणामी, तीन दिवसांत कांद्याच्या भावाने क्विंटलला पाचशे रुपयांनी उसळी घेतली.

चाळींमध्ये साठविलेल्या उन्हाळ कांद्याला भाव मिळेल की नाही, अशी स्थिती तयार झाली असताना, शेतकऱ्यांसाठी मागील तीन दिवस चांगले राहिले. दक्षिणेतील पावसामुळे कांद्याचे नुकसान होण्याचे यंदाचे सलग तिसरे वर्ष आहे. यंदा पावसाची चिन्हे दिसत नसल्याने साठवलेला कांदा मातीमोल भावाने विकावा लागण्याची चिन्हे होती.

अशा परिस्थितीत मुंबईत गुरुवारी (ता. २३) कांद्याला क्विंटलला सरासरी एक हजार ८०० रुपये भाव मिळाला. सोमवारी (ता. २०) दीड हजार रुपये क्विंटल भावाने कांद्याची विक्री झाली होती. गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत क्विंटलला पाचशे रुपयांनी भावात वाढ झालेल्या बाजारपेठांमध्ये सटाणा, पिंपळगाव बसवंत, उमराणेचा समावेश आहे. मनमाडमध्ये ४००, नाशिकमध्ये ४५०, देवळ्यात ४७५, नामपूर आणि येवला, कळवणमध्ये ३००, तर मुंगसेमध्ये २७५, लासलगावमध्ये १५० रुपयांनी भाव वधारले.

यंदा राजस्थानमध्ये कांद्याचे उत्पादन १५ ते २० टक्क्यांनी असले, तरीही पुढील महिन्यात बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या कांद्याचे पावसाने नुकसान झाल्याची माहिती देशभरातील व्यापाऱ्यांपर्यंत पोचली आहे. परिणामी, देशातील व्यापारी नाशिकच्या साठवलेल्या उन्हाळ कांद्याच्या खरेदीकडे वळाले आहेत. देशातंर्गत मागणी वाढल्याने कांद्याची निर्यात ‘स्लो-डाउन’ झाली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत खरेदी केलेल्या कमी भावाचा कांदा निर्यातदार परदेशात पाठवीत आहेत. हे प्रमाण एकूण निर्यातीच्या ३० टक्क्यांपर्यंत असल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे.

आयातदार ‘वेट ॲन्ड वॉच’मध्ये

अरब राष्ट्रासह सिंगापूर, मलेशिया, व्हीएतनाम, हाँगकाँग, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये आयातदारांनी कांद्याच्या भावात झालेली वाढ पाहून ‘वेट ॲन्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. हॉलंडचा कांदा ३५ रुपये किलो भावाने पोच देण्यास व्यापाऱ्यांनी तयारी दर्शविली आहे. मात्र, भारतीय कांद्याच्या तुलनेत हॉलंडचा कांद्याला ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत नाही. चीनमधील नवीन कांदा बाजारात येऊ लागला असून, व्यापाऱ्यांनी ३० रुपये किलो भावाने कांदा पोच देण्यास सुरवात केली आहे. इजिप्तचा नवीन कांदा बाजारात येण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी बाकी आहे. पाकिस्तानचा नवीन कांदा पुढील महिन्यात बाजारात येईल. पाकिस्तानमधील कांद्याचे उत्पादन २० टक्क्यांनी अधिक असल्याची माहिती भारतीय निर्यातदारांपर्यंत पोचली आहे.

तुर्कस्थानचा नवीन कांदा विक्रीसाठी बाजारात येऊ लागला आहे. हा कांदा श्रीलंकेत २६ रुपये किलो भावाने पोच देण्याची तुर्कस्थानमधील व्यापाऱ्यांनी तयारी दर्शवली. सद्यःस्थितीत श्रीलंकेत कांद्याची आवश्‍यकता नाही, पण तुर्कस्थानपेक्षा भारतीय कांदा ग्राहक विकत घेतील, या अनुभवामुळे श्रीलंकेतील आयातदारांनी नाशिकमधील व्यापाऱ्यांकडे कांद्याच्या भावाचा अंदाज घेण्यास सुरवात केली आहे.

-विकास सिंह, कांद्याचे निर्यातदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT