CET results server down  esakal
नाशिक

MHT-CET Exam Result : ‘सीईटी’ निकाल पाहण्यास सर्व्हर डाउनचा फटका!

Nashik News : राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे रविवारी (ता. १६) सायंकाळी एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे रविवारी (ता. १६) सायंकाळी एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. परंतु एकाच वेळी लाखो विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी भेट दिल्‍याने संकेतस्‍थळ ठप्प झाले होते. रात्री उशिरापर्यंत सर्व्हर डाउन राहिल्‍याने अनेक विद्यार्थ्यांना निकाल पाहताना अडचणी आल्‍या. (online CET results server down hit)

दरम्‍यान, नाशिकच्‍या रिहान इनामदार याने पीसीबी ग्रुपमधून ९९.९९ पर्सेंटाइल गुण मिळवीत विमुक्‍त जाती प्रवर्गातून राज्‍यात अव्वल क्रमांक मिळविला. इतरही अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्‍त्र आणि कृषी शाखांच्‍या पदवी अभ्यसक्रमांच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षा घेण्यात आली होती.

या परीक्षेचा निकाल १९ जूनपूर्वी जाहीर केला जाईल, अशी सूचना सीईटी सेलने काही दिवसांपूर्वी जारी केली होती. त्‍यातच काल (ता. १५) सुधारित सूचनापत्र जारी करत रविवारी (ता. १६) निकाल जाहीर करणार असल्‍याचे सूचित केले होते. त्‍यानुसार सायंकाळी सहाला निकाल जाहीर करण्यात आला. मात्र एकाच वेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सर्व्हरला भेट दिल्याने निकाल लागताच संकेतस्‍थळ ठप्प झाले. (latest marathi news)

रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. दरम्‍यान, सव्वाआठनंतर संकेतस्‍थळ सुरळीत करण्यात आल्‍याचे संबंधित यंत्रणांकडून सांगण्यात आले. दोन्‍ही ग्रुप मिळून राज्‍यभरातील ३७ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत शंभर पर्सेंटाइल गुण मिळविले आहेत.

प्रवेश प्रक्रियेचे लागले वेध

एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्‍याने आता विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेचे वेध लागले आहेत. सीईटी सेलकडून लवकरच प्रवेशाचे पुढील वेळापत्रक जाहीर केले जाणार असून, ऑनलाइन नोंदणी व गुणवत्ता यादीच्‍या प्रसिद्धीनंतर प्रवेश फेऱ्यातून प्रवेश निश्‍चितीची प्रक्रिया राबविली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT