NEET exam  esakal
नाशिक

NEET Exam : फक्‍त 5 विद्यार्थी पोचले ‘सातशेपार!’; 20 परीक्षा केंद्रांवरील 10 हजार 909 विद्यार्थ्यांचा ‘नीट’चा तपशील जाहीर

Nashik News : नॅशनल इलिजिब्‍लिटी कम एट्रान्‍स टेस्‍ट (नीट) यूजी- २०२४ या परीक्षेसंदर्भातील तपशिलवार माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्‍सीने (एनटीए) शनिवारी (ता. २०) संकेतस्‍थळावर जाहीर केली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नॅशनल इलिजिब्‍लिटी कम एट्रान्‍स टेस्‍ट (नीट) यूजी- २०२४ या परीक्षेसंदर्भातील तपशिलवार माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्‍सीने (एनटीए) शनिवारी (ता. २०) संकेतस्‍थळावर जाहीर केली. सुनावणीदरम्‍यान न्‍यायालयाने दिलेल्‍या आदेशानुसार तपशील जाहीर केला असून, यातून रंजक माहिती समोर आली आहे. (Only 5 Students Reached 700 in NEET exam)

नाशिक जिल्ह्यातील २० केंद्रांतून दहा हजार ९०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असली, तरी यापैकी अवघे पाचच विद्यार्थी गुणांबाबत सातशेपार पोहचू शकले आहेत. बिहारसह उत्तर प्रदेशातील काही राज्‍यांमध्ये ‘नीट’चा पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आल्‍यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी न्‍यायालयात धाव घेत दाद मागितली होती.

न्‍यायालयात ‘नीट’ परीक्षेसंदर्भात सुनावणी सुरू असून, नुकत्याच झालेल्‍या सुनावणीदरम्‍यान सर्व शहरनिहाय परीक्षा केंद्रांचा तपशील जाहीर करण्याचे आदेश न्‍यायालयाने ‘एनटीए’ला दिले होते. मात्र ही माहिती जाहीर करताना विद्यार्थ्यांची ओळख प्रदर्शित होणार नाही, याची खबरदारी घेण्याबाबतदेखील बजावले होते.

त्‍यानुसार ‘एनटीए’ने अनुक्रमांक व त्‍यासमोर संबंधित विद्यार्थ्याला मिळालेले गुण प्रदर्शित केले आहेत. नाशिक शहरासह जिल्‍हाभरात २० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा झाली होती. या केंद्रांवर एकूण दहा हजार ९०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्‍याचे आकडेवारीतून समोर येत आहे. परंतु या विद्यार्थ्यांमध्ये अवघ्या पाच विद्यार्थ्यांनी सातशे किंवा त्‍यापेक्षा जास्‍त गुण मिळविताना राष्ट्रीय स्‍तरावर डंका वाजविला आहे. (latest marathi news)

७१५ गुणांचा नाशिकचा ‘हायस्‍ट’

सातशे किंवा त्‍यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याने सर्वाधिक ७१५ गुण मिळविले आहेत. पंचवटी परीसरातील क. का. वाघ कृषी महाविद्यालय परीक्षा केंद्रावर परीक्षा दिलेल्‍या विद्यार्थ्याने ही कामगिरी केली आहे.

९१ विद्यार्थ्यांना उणे गुण

‘नीट’ दिलेल्‍या दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपैकी काही पठ्ठ्यांना शून्‍याचा आकडादेखील ओलांडता आलेला नाही. या परीक्षेत ‘निगेटिव्‍ह मार्किंग’ असल्‍याने बहुतांश उत्तरे चुकीची देणाऱ्या ९१ विद्यार्थ्यांना उणे (निगेटिव्‍ह) अर्थात, शून्‍यापेक्षा कमी गुण मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

योजनांना पात्र, तरीही कर्ज मिळेना; उपचाराअभावी मुलगा गमावला, चित्रकार मंत्रालयासमोर करणार 'अर्ध नग्न लक्षवेधी चित्र' आंदोलन

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Raju Shetti:'अन्यथा मुख्यमंत्र्यांना दिवाळी करू देणार नाही': माजी खासदार राजू शेट्टी; शेतकऱ्यांवर गंभीर संकट, मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल

SCROLL FOR NEXT