Poles placed in the middle of the road for CBS to Canada Corner road work to be excavated.
Poles placed in the middle of the road for CBS to Canada Corner road work to be excavated. esakal
नाशिक

Nashik News : मॉडेल रोडच्या सलग कामाला विरोध; 4 टप्प्यात कामाची अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महापालिका मुख्यालयासमोरील जुने सीबीएस ते कॅनडा कॉर्नर रस्ता आयडियल रोड म्हणून विकसित करण्याचे काम सुरू झाले आहे. परंतु स्थानिक व्यापारी, व्यावसायिकांना विचारात न घेता रस्त्याचे काम केले जाणार आहे. त्या व्यतिरिक्त रस्त्याचे काम करताना चार ते पाच टप्प्यात करण्याची मागणी नाशिक सिटीझन फोरमतर्फे महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्याकडे करण्यात आली आहे. (Nashik Opposite to continuous work of Model Road at sharanpur road marathi News )

पश्चिम विभागातील जुना सीबीएस ते कॅनडा कॉर्नर या १८ मीटर रुंदीच्या रस्त्यावर बसस्थानक, पोलिस परेड ग्राउंड, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन, बीएसएनएल कार्यालय तसेच विविध खासगी आस्थापना, शॉपिंग सेंटर व बँका आहेत. हा रस्ता कॉलेज रोड, महात्मानगर यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. गंगापूर रोड, त्र्यंबक रोड या महत्त्वाच्या रस्त्याला समांतर असल्याने या रस्त्यावर वाहतुकीचा ताण असतो.

सन २०१३-१४ मध्ये रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. सद्यःस्थितीत हा रस्ता पाणीपुरवठा, ड्रेनेज विभागाने जलवाहिन्या, मलवाहिका टाकण्यासाठी तसेच स्मार्टसिटी विभागाने व विविध कंपन्यांनी वेळोवेळी खोदल्याने खड्डेमय झाला आहे. वांरवार खोदकाम व पुन्हा दुरुस्तीत दरवर्षी करोडो रुपये खर्च होत असल्याने रस्त्याचे काँक्रिटीकरण करून आयडियल रोड म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

२५. ६२ कोटी रुपये खर्च करून अठरा मीटर रुंदीचा रस्ता तयार केला जाणार आहे. जुना सीबीएस ते कॅनडा कॉर्नर या दरम्यान १४ मीटर रुंदीचा काँक्रिट रस्ता असेल रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन मीटर रुंदीचा फुटपाथ तसेच दुभाजक, पावसाळी, सर्व्हीस लाईन, पाणीपुरवठा लाईनसाठी डक्ट निर्माण केले जाणार आहेत तसेच रस्त्यावर आकर्षक पथदीप लावले जाणार आहेत.  (latest marathi news)

दरम्यान, रस्ते कामाला ८ एप्रिलपासून सुरवात करण्यात आली. त्यापूर्वी वाहतूक पोलिसांकडून जुने सीबीएस ते कॅनडा कॉर्नर या दरम्यान पुढील दीड वर्षांसाठी रस्ता बंद करण्याची सूचना काढण्यात आल्याने व्यावसायिक, व्यापारी भडकले.

चार टप्प्यात व्हावे काम

सीबीएस ते कॅनडा कॉर्नर रस्त्याला जोडणारे आठ रस्ते पुढील दीड वर्षांसाठी बंद ठेवले जाणार असल्याने नाशिककरांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होईल. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर हॉस्पिटल्स, कार्यालये व व्यवसाय असल्याने आर्थिक फटका बसेल. यापूर्वी स्मार्टसिटीअंतर्गत दोन रस्त्यांचे काम झाले. तो अनुभव नाशिककरांना त्रासदायक होता.

त्याची पुनरावृत्ती मॉडेल रोडच्या कामात होईल. शहरातील वाहतुकीच्या केंद्रस्थानी नियोजित मॉडेल रोड आहे. त्यामुळे रस्ते कामाचे नियोजन करताना स्थानिक व्यापारी, व्यावसायिकांना नियोजन प्रक्रियेत सहभागी करून घेणे गरजेचे आहे. वाहतूक निर्बंधांमुळे व्यवसायांवर परिणाम होणार असल्याने त्या दृष्टीने विचार होणे गरजेचे आहे.

रस्ता बंद करून सुचविलेले पर्यायी मार्गावर आधीपासूनच वाहतूक ठप्प असते. त्यामुळे नवीन कामामुळे अधिक ताण वाढणार आहे. त्यामुळे सीबीएस ते कॅनडा कॉर्नर या संपूर्ण रस्त्यावर एकावेळी निर्बंध लागू करण्याऐवजी तीन ते चार टप्प्यांत कामाचे नियोजन करून एका टप्प्याचे काम सुरू असताना उर्वरित रस्त्यावर वाहतूक पूर्ववत चालु ठेवावी.

''यापूर्वी दोन स्मार्ट रस्त्याच्या कामाचा नाशिककरांना आलेला अनुभव चांगला नाही. त्यामुळे सलग रस्ता व उपरस्ते दीड वर्षांसाठी बंद न करता चार टप्प्यात मॉडेल रोडचे काम पूर्ण करावे.''- आशिष कटारिया, अध्यक्ष, नाशिक सिटीझन फोरम.

''मॉडेल रोड म्हणून विकसित केला जाणारा रस्ता सुस्थितीत असताना तोडण्याची गरज नाही. या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली तरी फार मोठा फरक पडेल. दीड वर्षे मुख्य रस्ता व त्याला समांतर आठ उपरस्ते बंद राहिल्यास व्यावसायिकांचे मोठे नुकसान होईल.''- हेमंत राठी, माजी अध्यक्ष, नाशिक सिटीझन फोरम.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

SCROLL FOR NEXT