Shital Abad, Pinky Abad, Prakash Abad, etc. at the inauguration of Panpoi at the bus stand. esakal
नाशिक

Nashik News : चांदवड बसस्थानकात प्रवाशांना मिळणार थंड पाणी

Nashik : श्री महावीर जैन सेवा केंद्राच्या वतीने येथील बसस्थानकात शनिवारी (दि. २३) पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.

भाऊसाहेब गोसावी : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील श्री महावीर जैन सेवा केंद्राच्या वतीने येथील बसस्थानकात शनिवारी (दि. २३) पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. महावीर सेवा केंद्राच्या माध्यमातून एकत्र आलेल्या येथील जैन समाजातील १३ सदस्यांनी स्वखर्चातून सामाजिक बांधीलकी जोपासत हा उपक्रम राबविल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. (Nashik Passengers will get cold water at Chandwad bus stand)

चांदवडची प्रथम दीक्षार्थी दिव्या आबड यांचे कुटुंबीय वडील शितल आबड, आई पिंकी आबड, आजोबा प्रकाश आबड यांच्या हस्ते प्रवासी व नागरीकांना पाण्याचे वाटप करुन पाणपोईचा शुभारंभ करण्यात आला. मार्चच्या सुरुवातीपासूनच तालुक्यात उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. चांदवड बसस्थानक परिसरात पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवासी व नागरीकांना ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते.

प्रवासी व नागरीकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन येथील श्री महावीर जैन सेवा केंद्राच्या वतीने सुमारे १० वर्षांपासून बसस्थानकात येणाऱ्‍या-जाणाऱ्‍या प्रवाशांसाठी पाणपोईची सोय उपलब्ध करुन देण्यात येत आहे. बसस्थानकातील बसचालक, वाहक, प्रवासी व नागरीकांना पिण्याच्या पाण्याचे वाटप करुन या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. (latest marathi news)

प्रवासी व नागरीकांना ऐन उन्हाळ्यात पिण्याचे थंड व शुद्ध पाणी उपलब्ध करुन दिल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. उन्हाळ्याच्या अखेरपर्यंत हा उपक्रम सुरु ठेवणार असल्याचे महावीर केंद्राच्या सदस्यांनी सांगितले.

याप्रसंगी सेवा केंद्राचे सदस्य जव्हरीलाल संकलेचा, पोपटलाल फुलफगर, प्रा. एम. जी. जैन, नंदकुमार पारख, सुनील लुणावत, सुनील आबड, बसस्थानक व्यवस्थापक रवींद्र निकाळे आदींसह बसचालक, वाहक, विद्यार्थी व नागरीक उपस्थित होते. प्रा. एम. जी. जैन यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT