Sakal Impact esakal
नाशिक

SAKAL Impact : पंचवटी एक्स्प्रेसमध्ये महिलांच्या डब्यात पेट्रोलिंग

Nashik News : पंचवटी एक्स्प्रेसमध्ये महिलांच्या डब्यामध्ये आरपीएफ आणि रेल्वे पोलिस पेट्रोलिंग करणार असल्याचे रेल्वेने नुकतेच पत्र जारी केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पंचवटी एक्स्प्रेसमध्ये महिलांच्या डब्यामध्ये आरपीएफ आणि रेल्वे पोलिस पेट्रोलिंग करणार असल्याचे रेल्वेने नुकतेच पत्र जारी केले आहे. ‘सकाळ’ मध्ये या संदर्भात वृत्त छापून आले होते. या वृत्ताची दखल घेत रेल्वेने पत्र जारी केले आहे. नाशिक रोड येथून रोज अनेक महिला कल्याण सीएसटीपर्यंत अपडाऊन करतात. महिलांच्या डब्यात पुरुष घुसतात. अनेक वेळा त्यांना जागा मिळत नाही. (Patrolling in ladies compartment in Panchavati Express)

लोकलचे तिकीट काढलेले पुरुष महिलांच्या डब्यात सीएसटीपासून कल्याणपर्यंत घुसखोरी करतात. त्यामुळे नाशिक, मनमाड येथे येणाऱ्या महिला प्रवाशांना जागा मिळत नाही.

दरवाजात उभे राहून तीन तासाचा प्रवास करावा लागतो. या संदर्भात ‘सकाळ’ ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत रेल्वेने पेट्रोलिंग करण्याचे पत्र नुकतेच जारी केले आहे. (latest marathi news)

"रेल्वेने रोज महिलांच्या डब्यामध्ये आरपीएफने पेट्रोलिंग करायला हवे. पुरुष या डब्यात प्रवास करतात, महिलांना जागा मिळत नाही. अनेक वेळा महिलांना शारीरिक इजा होतात. त्यामुळे रेल्वेने याची गंभीर दखल कायमस्वरूपी घेतली पाहिजे" - राजेश फोकने, रेल्वे प्रवासी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway: तिकीट बुक न झालेल्यांसाठी गुडन्यूज! कोकणात 4 अनारक्षित रेल्वे सोडण्याचा निर्णय, मध्य रेल्वेची घोषणा

भांडुपमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! २० लाखांचा गुटखा पानमसाला जप्त, नऊ आरोपींना अटक; पाच वाहने जप्त

जन्मठेप भोगणाऱ्या माजी खासदाराच्या फोनमध्ये १५० पेक्षा जास्त पॉर्न क्लिप्स, जेलमधून गर्लफ्रेंडला करायचा कॉल

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाकारली

Baramati News: महिलेसोबतचे प्रेमसंबंध पतीला समजले, बारामतीत १९ वर्षीय तरुणाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT