शिवसेनेचा विरोध sakal
नाशिक

नाशिक : परवाना शुल्कवाढीला शिवसेनेचा विरोध

महापालिका हद्दीत जागा परवाना शुल्कात वाढ करण्याचा प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावाला शिवसेनेने विरोध केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिका हद्दीत जागा परवाना शुल्कात वाढ करण्याचा प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावाला शिवसेनेने विरोध केला आहे. दहा वर्षात न झालेली वाढ एकाच वर्षात करून प्रशासन कष्टकरी नागरिकांवर अन्याय करत असल्याचे निवेदन विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना दिले आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

कोरोना पार्श्‍वभूमीवर अनेकांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. लॉकडाउनमुळे हिरावलेला रोजगार व संपत आलेली बचत यामुळे हा वर्ग मेटाकुटीला आला आहे. अर्थचक्र पुन्हा रुळावर येत असताना महापालिकेने या वर्गासाठी प्रस्तावित केलेली परवाना शुल्कातील वाढ अन्यायकारक आहे. यामुळे या वर्गाचे संपूर्ण आर्थिक नियोजनच कोलमडण्याची दाट शक्यता आहे.

हा सर्व वर्ग किरकोळ विक्रेत्यांचा आहे. यामध्ये फटाके, विटा, लाद्या, साबण तयार करणे, तेल गाळणे, साबुदाणा कारखाना, मुरमुरे तयार करणे यासारख्या किरकोळ व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचा समावेश आहे. या वाढीमुळे या सर्व वर्गाला मोठया प्रमाणात आर्थिक भूर्दंड बसू शकतो. ज्या वर्गाला आज १० रुपयेदेखील महत्त्वाचे आहे. त्यांच्यासाठी १००० रुपयांपर्यंतची वाढ आवाक्याबाहेरची आहे. त्यामुळे शहरातील कष्टकरी व हातावर पोट भरणाऱ्या वर्गावर होत असलेली ही शुल्क वाढ महासभेत नामंजूर करावी, अन्यथा या विरुद्ध या वर्गाला सोबत घेऊन शिवसेना रस्त्यावर जनआंदोलन उभारेल असा इशारा महापालिकेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

SCROLL FOR NEXT