Leopard Attack  Sakal
नाशिक

Nashik Leopard Attack : ओणे येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव कुत्रा व वासरू ठार!

Nashik News : निफाड तालुक्यातील ओणे गावालगतच्या प्रगतशील शेतकरी शरद शिवाजी हाळदे याच्या वस्तीवर गोठ्यातील गाईच्या वासरावर बिबट्याने हल्ला केला.

सकाळ वृत्तसेवा

ओझरता : निफाड तालुक्यातील ओणे गावालगतच्या प्रगतशील शेतकरी शरद शिवाजी हाळदे याच्या वस्तीवर गोठ्यातील गाईच्या वासरावर बिबट्याने हल्ला केला. दोन दिवस आधी (१७ जुलै च्या रात्री) त्यांच्याच वस्तीवरील पाळीव कुत्र्यावर देखील हल्ला करून ठार केले होते. त्यामुळे पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या आधी देखील बऱ्याचदा बिबट्याने दर्शन दिले होते. (pet dog and calf were killed in leopard attack in niphad)

त्याबाबत संबंधित विभागास कळविण्यात आले होते. हळदे पाटील वस्तीवरील बिबटयाच्या हल्ल्याची बातमी ऐकून आजूबाजूच्या परिसरात हळहळ व्यक्त करून शेतकरी व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भविष्यकाळात मानवी जीवनावर हल्ला होऊ नये यासाठी वनविभागाने या गोष्टीची दखल घेऊन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी ओणे ग्रामस्थ व पांचक्रोशीतील नागरिकांकडून करण्यात येत आहे. (latest marathi news)

"परिसरातील बिबट्याच्या सततच्या वावरामुळे वस्तीवरील शेतकरी धास्तावले असून हळदे वस्ती, पवार वस्ती गावालगत असल्याने बहुतेक शेतकरी वस्तीकरून राहतात वाटेने जातांना रात्रीचा अंधार असतो स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी व वनविभागाने त्वरीत पिंजारा लावावा."- शरद शिवाजी हळदे ओणे हल्ल्यात ठार झालेले वासरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Fuel Saving Appeal : PM मोदींच्या 'इंधन बचती'च्या सल्ल्याला घरचा आहेर? 500 गाड्यांचा ताफा काढून भाजप नेत्याचे शक्तिप्रदर्शन!

Virat Kohli ने ज्या मॉडेलची पोस्ट लाईक केली होती, तिचा खळबळजनक दावा; म्हणाली, 'मला पैशांचं आमिष दाखवलं'

Mumbai News: पालिका शाळेत संविधानाचे धडे, शिक्षण समितीसमोर अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव

Latest Marathi News Live Update : नीट पेपर फूट प्रकरण, १६ संशयित आरोपी तपास यंत्रणांच्या ताब्यात

Navi Mumbai: नवी मुंबईत २४ तास पाणीपुरवठा कपात, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT