Block in road
Block in road esakal
नाशिक

NMC News: पिंपळगाव खांब मलनिस्सारण केंद्राची अडविली वाट! रस्ता भूसंपादन न करताच केंद्र तयार ; महापालिकेचा अजब कारभार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पाथर्डी, इंदिरानगर भागातील वाढती नागरी वस्ती लक्षात घेता महापालिकेने पिंपळगाव खांब येथे ३२ दशलक्ष लिटर क्षमेतेचा मलनिस्सारण प्रकल्प उभारला खरा परंतु त्या मलनिस्सारण केंद्रात पोचण्यासाठी रस्ताच नाही. खासगी जागेतून केंद्रापर्यंत जावे लागतं असल्याने वाढत्या रहदारीमुळे मलनिस्सारण केंद्राकडे जाणारे रस्ते खासगी जागा मालकांनी मातीचे ढिगारे टाकून बंद केले.

त्यामुळे २२ कर्मचाऱ्यांना दूरवरून पायपीट करतं कामावर पोचावे लागते. मलनिस्सारण करण्यापूर्वी रस्त्यांचे भूसंपादन न झाल्याने कर्मचाऱ्यांना केंद्रावर पोचण्यासाठी द्राविडी प्राणायाम करावा लागतं आहे. गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात भूसंपादन झाले असताना अडीचशे मीटरच्या भूसंपादन न झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. रस्ता नसेल तर मलनिस्सारण केंद्र तयार करण्याची घाई का केली, असे एक ना अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. (Nashik Phata to Pimpalgaon Khamb Sewerage Center block news)

महापालिकेने मलजल व्यवस्थापनाकरिता सर्वकक्ष मलनिस्सारण व्यवस्थापन आराखडा तयार केला. शहराच्या भौगोलिक संरचनेनुसार महापालिका क्षेत्रात आठ सिव्हरेज झोन तयार करण्यात आले. झोनमध्ये रहिवासी भागातील तयार होणारे सांडपाणी वाहून नेण्यासाठी सुमारे १९१९ किलोमीटर लांबीच्या मलवाहिका टाकण्यात आल्या.

त्यावर प्रक्रिया करण्यासाठी १८ पंपिंग स्टेशनद्वारे सहा मलनिस्सारण केंद्रामध्ये वाहून नेण्यात येऊन सुमारे ३५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्यावर प्रक्रिया केली जाते. सद्यःस्थितीत तपोवन, आगर टाकळी, चेहेडी, पंचक, गंगापूर व पिंपळगाव खांब या सहा सीवरेज झोनमध्ये मलनिस्सारण केंद्र कार्यान्वित आहे.

त्या केंद्रांची एकूण स्थापित क्षमता ३९२.५० एमएलडी आहे. ३९२.५० एमएलडी क्षमतेच्या केंद्रापैकी तपोवन, आगर टाकळी, चेहेडी व पंचक या चार झोनमधील ३४२.५० एमएलडी क्षमतेचे केंद्र २०१५ पूर्वी कार्यान्वित आहे. पिंपळगाव खांब येथे ३२ दशलक्ष लिटर क्षमेतेचे मलनिस्सारण केंद्र तयार करण्यात आले. (Latest Marathi News)

मलनिस्सारण केंद्र तयार करताना भूसंपादनापासून ते पूर्णत्वास येईपर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. भूसंपादनाला स्थानिक नागरिकांचा विरोध होता. मलनिस्सारण केंद्राला लोकांचा विरोध होता. परंतु शासनाचा निधी परत जाण्याची भीती दाखवत केंद्राचे काम पूर्ण करण्यात आले.

कर्मचाऱ्यांची पायपीट

मलनिस्सारण केंद्रासाठी वाटाघाटींद्वारे जागा ताब्यात घेण्यात आली असली तरी मलनिस्सारण केंद्राकडे जाणारे रस्त्यांचे मात्र भूसंपादन झाले नाही. त्यामुळे मलनिस्सारण केंद्र तयार झाल्यानंतर खासगी जागेचा वापर सुरू होता. परंतु मलनिस्सारण केंद्राकडे जाणारे अवजड वाहनांची गर्दी झाल्याने खासगी जागा मालकांनी मातीचे ढिगारे टाकून रस्ता अडविला. त्यामुळे मलनिस्सारण केंद्राकडे जाण्यासाठी रस्ता नाही. २२ कर्मचाऱ्यांना अन्य खासगी क्षेत्रातून दूरवरून पायपीट करून कामावर जावे लागते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Exit Poll: सांगलीची पाटीलकी विशाल पाटलांकडे? भाजपला बसणार अँटी इनकबन्सीचा फटका

Mumbai Rain Update : मुंबईत पाऊस कधी येणार? जाणून घ्या हवामान अभ्यासकांचा अंदाज

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Lok Sabha Election Result 2024 : ‘इंडिया’ चेच सरकार येणार 'तेजस्वी यादव' यांचा विश्‍वास: एनडीए हद्दपार होणार

Lok Sabha 7th Phase Voting : देशात सातव्या टप्प्यात ५९ टक्के मतदान! पश्चिम बंगालात सर्वाधिक तर यूपीत सर्वात कमी मतदान

SCROLL FOR NEXT