During the planting of trees on the occasion of Environment Day in the District Court, the Judge of the District and Sessions Court. N.V. Life and death. Ghule Adv. Avinash Bhide, Advocate, Judicial Staff. esakal
नाशिक

Environment Day: नाशिकमधील न्यायालयांमध्ये 25 वृक्षांचे रोपण! जिल्हा न्यायालयापासून प्रारंभ; पर्यावरण दिनानिमित्ताने संकल्प

Nashik News : ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. अविनाश भिडे हे ‘हिरवाकुंर’ फाऊंडेशनचे विश्वस्त असून, या फाऊंडेशनच्या माध्यमातून पर्यावरणाशी निगडित काम केले जाते.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दिवसेंदिवस वृक्षांची होणारी कत्तल आणि पर्यावरणाचा र्हास होतो आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे संवर्धन काळाची गरज आहे. ही बाब ओळख नाशिक जिल्हा न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. अविनाश भिडे यांनी पुढाकार घेत जिल्हा न्यायालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील न्यायालयांच्या आवारात २५ वृक्षांचे रोपण केले जाणार असून, त्यांच्या संवर्धनासाठी त्या-त्या न्यायालयातील न्यायधीश व ज्येष्ठ विधीज्ञांना ते दत्तक दिले जाणार आहेत. या उपक्रमाचा प्रारंभ नाशिक जिल्हा न्यायालयात वृक्षारोपण करून करण्यात आला आहे. (Nashik Plantation of 25 trees in court news)

ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. अविनाश भिडे हे ‘हिरवाकुंर’ फाऊंडेशनचे विश्वस्त असून, या फाऊंडेशनच्या माध्यमातून पर्यावरणाशी निगडित काम केले जाते. याच माध्यमातून ॲड. भिडे यांनी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायधीश जगमलाणी यांना पत्र देत, जिल्हाभरातील न्यायालयांमध्ये दरवर्षी २५ वृक्षांचे रोपण करण्यासंदर्भातील संकल्पना मांडली. या संकल्पनेला प्रधान न्यायधीश जगमलाणी यांनी तत्काळ मान्यता दिली. या संकल्पनेनुसारच उपक्रमाचा प्रारंभ नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयापासूनच करण्यात आली.

नाशिक जिल्हा न्यायालयाच्या आवारात पर्यावरण दिनानिमित्ताने जिल्हा व .सत्र न्यायधीश एन. व्ही. जीवने, न्यायधीश घुले यांच्या हस्ते दोन वृक्षांचे रोपण करण्यात आले. येत्या काही दिवसात टप्प्या-टप्प्याने जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये २५ वृक्षांचे रोपण केले जाणार आहे. तसेच, या वृक्षांच्या संगोपन व संवर्धनाची जबाबदारी न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञांना दत्तक देऊन केली जाणार आहे. यावेळी न्यायालयात वकील, कर्मचारी उपस्थित होते. (latest marathi news)

अशी आहे संकल्पना

- जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात दरवर्षी २५ वृक्षांचे रोपण

- वृक्षारोपण केलेल्या वृक्षांना देणार दत्तक

- २५ पैकी ५ वृक्षांचे संगोपन व संवर्धनासाठी न्यायालयांना दत्तक

- उर्वरित वृक्षांचे संगोपन व संवर्धनासाठी त्या-त्या न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञांना दत्तक

- सुट्टीचा कालावधी संपल्यानंतर न्यायालयांमध्ये होणार वृक्षारोपण

- भारतीय प्रजातीचीच झाडांचे केले जाणार रोपण

"जिल्हाभरातील न्यायालयांमध्ये दरवर्षी २५ वृक्षांचे रोपण करण्याची संकल्पना आहे. त्याचा प्रारंभ आज जिल्हा न्यायालयापासून करण्यात आली. सध्या न्यायालयांची सुट्टी सुरू असून, न्यायालय नियमित सुरू झाल्यानंतर वृक्षारोपण केले जाईल."

- ॲड. अविनाश भिडे, ज्येष्ठ विधीज्ञ तथा विश्वस्त, हिरवाकुंर फाऊंडेशन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident: 'त्याच' थारवर जाऊन कार कोसळली; ताम्हिणी घाटात पुन्हा तसाच अपघात, एकाचा मृत्यू

Paithan Political : उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात; पैठणच्या राजकारणात उत्सुकता ताणली!

Ranjangaon MIDC Scam : रांजणगाव एमआयडीसीत नोकरीचे आमिष; ४७ तरुण-तरुणींची सत्तर हजारांची फसवणूक; दोघांना अटक!

Cigarette Prices Hike : आधी १० रुपयांना मिळणारी सिगारेट आता किती रुपयांना मिळणार?

Manoj Jarange: 'दहा वाजेपर्यंत MPSCच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवा, नाहीतर...', मनोज जरांगे नदीपात्रात ठाण मांडून, मुख्यमंत्री फोनवरुन बोलणार

SCROLL FOR NEXT