Young woman preparing a har of expensive roses.
Young woman preparing a har of expensive roses. esakal
नाशिक

Nashik : नैसर्गिक फुलांनी उजळले गुलशनाबाद!

दत्ता जाधव

नाशिक : पुरातन काळापासून नाशिक व परिसर विविध नावांनी ओळखला जातो. जनस्थान. त्रिकंटक, गुलशनाबाद, नासिक आणि आता नाशिक याचा त्यात समावेश होता. सतराव्या शतकात मोगलांनी नाशिकचे नाव बदलून गुलशनाबाद केले व सुभ्याचे मुख्य ठिकाण ठेवले.

अर्थात, गुलाबाचे शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये मधल्या काळात कृत्रिम फुलांनी जागा घेतली होती. मात्र कोरोनाकाळात कृत्रिमतेतून खरी अनुभूती मिळत नसल्याची प्रचीती आल्याने आता नाशिककरांचा पुन्हा नैसर्गिक फुलांकडे कल वाढला आहे. (nashik poeple buying natural flowers Nashik News)

मुळातच, फुले कोमेजतात, वाळतात. त्यातून खतनिर्मिती करून पुन्हा नवीन झाड, नवीन फुले असे निसर्गचक्र अव्याहत सुरू राहते. काही फुले वाळली अथवा वाळवली तरी त्यांचे रूप, रंग, आकार बदलत नाही. काही फुलांचे गुणधर्म जसेच्या तसे टिकून राहतात.

अशा फुलांचा उपयोग पुष्पचक्र, हार, गुच्छ व घरगुती सजावटीसाठी केला जातो. सणावाराच्या पार्श्‍वभूमीवर शहराच्या विविध भागामध्ये फुलांचा बाजार ग्राहकांनी फुलून जातोय. कोरोनाकाळात दोन वर्षे सर्व मठ-मंदिरे कुलूपबंद होती. त्यामुळे फुलांनाही अपेक्षित मागणी नव्हती, मात्र सध्या गणेशोत्सवामुळे ती वाढली आहे.

८८८ हेक्टरवर फुलशेती

नाशिक परिसरातील मखमलाबाद, म्हसरूळ, हिरावाडी, तपोवन, इंदिरानगर भागात मोठ्या प्रमाणावर फुलाचे उत्पादन घेतले जात होते. सुरगाणा तालुक्यात ५, नाशिक तालुक्यात १९४.९०, चांदवडमध्ये ३८३, दिंडोरीत २७३.४०, येवल्यात ३२ अशी एकूण ८८८.३० हेक्टरवर फुलशेती केली जाते. कोरोनामध्ये अनेकांचा रोजगार हिरावला गेला.

त्यामुळे अनेकांनी फुले, फुलांचे हार विक्री सुरू केली. गणेशवाडीतील तीनशे कुटुंब फूल व्यवसायावर अवलंबून आहेत. शहरातील मंदिरांबाहेरील विक्रेत्यांचा विचार करता सातशे कुटुंबांना फुलांनी आधार दिला आहे. बाजारात एरव्ही दहा रुपयांमध्ये मिळणाऱ्या सुट्या फुलांच्या वाट्यासाठी आता वीस रुपये द्यावे लागतात.

छोट्या हारासाठी पन्नास रुपये मोजावे लागतात. एका सार्वजनिक मंडळाने दहा दिवसांच्या उत्सवातील गणरायासाठी हाराची मागणी नोंदवली असून, प्रत्येक दिवशी एका हाराला दोन हजार रुपये कार्यकर्ते देतात.

कृत्रिमतेकडून वास्तवाकडे प्रवास

नैसर्गिक फुले नित्यनियमाने बदलली जातात. मात्र कृत्रिम फुले तशीच राहतात. त्यावर धुळ बसते. कीटक, जीवणांचू वावर वाढतो. त्यामुळे आजारांना आमंत्रण मिळते. ही सारी अनुभूती मिळाल्याने नाशिककरांचा आता कृत्रिमतेकडून वास्तवाकडे म्हणजे, नैसर्गिक फुले विकत घेण्याकडे कल वाढला आहे.

नाशिकमधील फुलांचा भाव

(आकडे किलोला रुपयांमध्ये)

- झेंडू- १०० ते २००

- शेवंती- २०० ते ३००

- ॲस्टर- १५० ते २००

- निशिगंधा- १६० ते २२०

- गुलछडी-३०० ते ४००

(गुलाब-गड्डीला १० ते २५)

फुलशेतीच्या ‘हायलाइट्स'

- जागतिक बाजारपेठेत भारतीय फुलांचा ०.०७ ते ०.०९ टक्के हिस्सा, निर्यातीत देशाचा २९ वा क्रमांक

- देशात दोन लाख ५५ हजार हेक्टरवर फुलशेती, वर्षाला २३ ते २५ हजार टनांची निर्यात, निर्यातीतून ५०० कोटींहून अधिक रुपयांची मिळते परकीय चलन

- महाराष्ट्रामध्ये १९ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर फुलांची केली जाते लागवड, फुलशेतीचे राज्यातील प्रमाण ३.१० टक्के आणि १९.३ टक्के उत्पादनाचे प्रमाण

- हरितगृह आणि मोकळ्या जागेतील फुलशेतीला चालना देण्याच्या सरकारच्या धोरणामुळे फुलशेतीला मिळाली चालना

भगवद्‍गीता ९ वा अध्याय, श्‍लोक २६

पत्रं पुष्पं फलं तोयं ये मे भक्त्या प्रयच्छति ।

तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥

अर्थात, जो कोणी भक्त प्रेमाने पान, फूल, फळ, पाणी आदी अर्पण करतो, त्या शुद्ध बुद्धीच्या व निष्कामप्रेमी भक्ताने प्रेमाने अर्पण केलेले ते पान, फूल आदी सगुण रूपाने प्रकट होऊन मोठ्या प्रीतीने खातो.

"गुलाब, जर्बेरा आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्पादन शेतकरी घेतात. त्यास परदेशी बाजारपेठ उपलब्ध झाल्यास नाशिकचे गुलशनाबाद ही ओळख खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात अवतरेल. आता उत्पादन कमी असले, तरी तेजीमुळे उत्पादकांत समाधान आहे."

-प्रदीप चव्हाण (फूल उत्पादक, वासाळी)

"पावसामुळे फुलांच्या उत्पादनात मोठी घट झाली. गणेशोत्सवातील मागणीमुळे भावात तेजी असल्याने शेतकरी आनंदात आहेत."

- मच्छिंद्र आडके (गुलाब उत्पादक, नागापूर) आणि साहेबराव कानमहाले (चेहेडी)

"सध्या सर्व प्रकारच्या फुलांसह तयार हारांना मोठी मागणी आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणावर पूजा-विधी सुरू असल्याने फुलांना चांगली मागणी आहे."-रेखाताई गरकळ (फुलविक्रेत्या)

"फुलांच्या विक्रीतून रोजगार उपलब्ध होतो. त्याच्या दुप्पटीहून अधिक अप्रत्यक्ष रोजगाराची संधी कुटुंबांना मिळते आहे." -मुन्ना माळी (विक्रेता)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT