drunk and driving crime esakal
नाशिक

Nashik Police : ‘रॅश-ड्रायव्हिंग’, ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’ विरोधात कारवाईचा बडगा! शहर वाहतूक शाखेकडून धडक कारवाई होणार

Nashik News : कारवाईमध्ये असे वाहनचालक आढळून आल्यास त्यांच्या गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेशच वाहतूक शाखेच्या उपायुक्तांनी दिले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police : गेल्या काही दिवसांमध्ये शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये बेदरकारपणे वाहने चालवून धडक देत प्राणांकित अपघातांचे सत्रच सुरू आहे. रॅश-ड्रायव्हिंग आणि मद्यपान करून बेफाम वाहन चालवून दुसऱ्याच्या जीवावर उठणाऱ्या वाहनचालकांविरोधात शहर वाहतूक शाखेकडून धडक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. कारवाईमध्ये असे वाहनचालक आढळून आल्यास त्यांच्या गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेशच वाहतूक शाखेच्या उपायुक्तांनी दिले आहेत. (Nashik Police Action against rash driving drunk drive)

पुण्यातील पॉश कारचा अपघात आणि सध्या मुंबईतील हिट ॲण्ड रन हे प्रकरण राज्यभर गाजते आहे. त्यातच गेल्या महिन्यात सातपूर हद्दीमध्ये मद्यपी चालकाने त्यांची निस्कॉन कार थेट रोहाऊसची भिंती तोडून आत शिरली होती. यात चिमुकल्यासह तिघे जण जखमी झाले होते. त्यानंतर सातत्याने शहरात अशा प्रकारचे अपघात होत आहेत.

गंगापूर रोडवरील बारदान फाटा येथे तर रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या पादचारी महिलेला मद्यपी चालकाने जोरदार धडक दिली. यात महिला ठार झाली. या घटनेची शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गंभीर दखल घेत, वाहतूक शाखेला अशा वाहनचालकांविरोधात कठोर कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश दिले आहेत.

त्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी शहर वाहतूक शाखेच्या पंचवटी, सरकारवाडा, अंबड आणि नाशिकरोड या चारही विभागांना ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’, ‘रॅश ड्रायव्हिंग’सह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठेार कारवाईचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे, पोलीस ठाण्यांनाही अपघाताच्या गुन्ह्यांमध्ये कठोर कलमांन्वये गुन्हे दाखल करून कारवाईच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. (latest marathi news)

हे करणार

- आयुक्तालय हद्दीमध्ये सायंकाळपासून रात्रीपर्यंत नाकाबंदी

- नाकाबंदी ड्रंक ॲण्ड ड्राईव्हच्या केसेस करणार

- सीसीटीव्हीच्या मदतीने रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई होणार

- रात्री उशिरापर्यंत विनापरवानगी सुरू राहणाऱ्या हॉटेल्सवर कारवाई

- बिअरबारमध्ये मद्यपींची केली जाणार चौकशी

- मद्यपान करून वाहन चालविल्यास थेट गुन्हा दाखल होणार

"शहर वाहतूक शाखेमार्फत रॅश ड्रायव्हिंग आणि ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह करणाऱ्यांविरोधात धडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यासाठी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येईल."

- चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, शहर वाहतूक शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Video: काच तोडली अन् प्रवाशांची सुटका! पण उंचावरून चालणारी मोनोरेल बंद कशी पडली? कारण समोर, पाहा सुटकेचा थरारक व्हिडिओ

Rahul Gandhi : वोटर अधिकार यात्रेत राहुल गांधींच्या गाडीची पोलीस कर्मचाऱ्याला धडक अन्...; पुढे काय घडलं? वाचा...

Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचा कहर! भिंत कोसळल्याची घटना, रहिवाशांचे स्थलांतर

Monorail: मुंबईत चालती मोनोरेल मध्येच अडकली! अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु

Kidney Failure Causes: किडनी फेल होण्याचं कारण बनतो UTI? 'ही' 5 लक्षणं वेळीच ओळखा आणि उपाय जाणून घ्या

SCROLL FOR NEXT