Nashik Police Commissionerate esakal
नाशिक

Nashik Police : गुढी पाडवा, रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क! आयुक्तालय हद्दीमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त

Nashik News : उद्या मराठी नववर्षातील पहिला सण गुढी पाढवा आणि गुरुवारी (ता. ११) मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईद असे दोन सण येत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police : उद्या मराठी नववर्षातील पहिला सण गुढी पाढवा आणि गुरुवारी (ता. ११) मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईद असे दोन सण येत आहेत. तर रविवारी (ता. १४) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलीस सतर्क असून, कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

गुढी पाडव्याला काही संघटनांकडून शहरातून मिरवणूका काढण्यात येणार आहेत तर, रमजान ईद आणि डॉ. आंबेडकर जयंती यादिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस ठाणेनिहाय शांतता समितीच्या बैठका घेण्यात येऊन पोलिसांकडून सामाजिक सलोखा राखण्यासंदर्भातील सूचना देण्यात येत आहेत. (Nashik Police alert in wake of Ramadan Eid Gudhi padwa marathi news)

शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त आणि पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांसह गुन्हेशाखाच्या प्रभारी पोलीस अधिकारी यांच्यासमवेत आढावा बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये येत्या आठवड्यातील महत्त्वाच्या सण-उत्सवांसंदर्भात चर्चा करून शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार शहर गुन्हेशाखेच्या विशेष शाखेमार्फत पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, शहरातील संवेदनशिल ठिकाणी जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्याच्याही सूचना आयुक्त कर्णिक यांनी दिल्या आहेत. गुढी पाडव्यानिमित्ताने शहरातील काही संघटनांकडून मिरवणुका काढण्यात येणार आहेत.  (latest marathi news)

या मिरवणुकांना परवानग्या देताना पोलिसांनी आयोजकांना सूचना देण्याचे आदेशही विशेष शाखेमार्फत देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, गुरुवारी (ता. ११) मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सण आहे. यानिमित्ताने बाजारपेठांमध्ये गर्दी असणार आहे. तसेच, इदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठाण होईल. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सतर्कता बाळगली जात आहे.

असा आहे बंदोबस्त

परिमंडळ एक - सात पोलीस निरीक्षक, १४ सहाय्यक पोलीस निरीक्षक, १६० पोलीस कर्मचारी, १४ महिला पोलीस कर्मचारी, शीघ्र कृती दल आणि राज्य राखीव दलाची प्रत्येकी एक-एक तुकडी.

परिमंडळ दोन - एक पोलीस निरीक्षक, ५० कर्मचारी, दहा महिला कर्मचारी, शीघ्र कृती दल व राज्य राखीव दलाच्या प्रत्येकी एक-एक तुकडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT