online fraud 
नाशिक

ऑनलाइन नायझेरियन फ्रॉडचा भांडाफोड; नाशिक पोलिसांनी दिल्लीत आवळल्या संशयिताच्या मुसक्या

विनोद बेदरकर

नाशिक : डेटींग ॲपवरुन महिलेसोबत झालेली ओळख शहरातील  ४० वर्षीय व्यापाऱ्याला चांगलीच महागात पडली. ऑनलाईन झालेल्या ओळखीतून व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करत नाशिकच्या व्यापाऱ्याची सुमारे २० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. वाचा नेमके काय घडले

टुली मॅडल वर झाली ओळख

शहरातील ४० वर्षीय व्यापाऱ्याने ट्रुली मॅडली नावाच्या डेटींग ॲपवरुन मोनिका सिंग या महिलेसोबत ओळख केली. या महिलेने व्यापाऱ्यासोबत फक्त व्हॉट्सअपवरुन चॅटींग करुन ओळख वाढवली. तसेच ती स्वत: नेदरलँड येथील ॲमस्टरडॅम येथे राहत असून बोरटॅड फार्मासिटीकल कंपनीत नोकरीस असल्याचे भासवले. व्यापाऱ्याचा विश्वास संपादन केल्यानंतर संशयिताने आमच्या कंपनीस औषध बनवण्यासाठी तेल लागत असून ते दक्षीण भारतात मिळते असे सांगितले. व्यापाऱ्यास कर्नाटक राज्यातील बिदर येथील राजेश नंदी याच्याशी संपर्क साधून सहा लिटर तेल कुरीअर मार्फत मागवण्यास सांगितले. तसेच हे तेल बेंगलोर येथून तपासण्याचा बहाणा केला. त्यानंतर या महिलेने व्यापाऱ्यास पुन्हा २०० लिटर तेल घेण्यास सांगून त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात १९ लाख ६० हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार व्यापाऱ्याने ते पैसे भरले. 

असा लागला तपास

मात्र त्यानंतर संपर्क न झाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यापाऱ्याने २० नोव्हेंबरला सायबर पोलिसांकडे तक्रार केली. सायबर पोलिसांनी पोलीस निरीक्षक देवराज बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमून दिल्ली येथे सापळा रचला. आरोपी हे दररोज बँक खात्यातून पैसे काढत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी दिल्लीतील उत्तम नगर येथील बँकामध्ये पाळत ठेवली. संशयितांनी पैसे काढताच पोलिसांनी दोघांना पकडले. त्यांची चौकशी केली असता त्यातील एकाचे नाव व्हिक्टर डॉमिनिक ओकॉन (४२, रा. नवी दिल्ली) आणि पवनकुमार हरकेश बैरवा (२४, रा. राजस्थान, सध्या रा. दिल्ली) असे सांगितले. व्यापाऱ्याची सुमारे २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी दिल्ली येथून नायजेरीयन संशयितासह दोघांचाही ताबा घेत त्यांना नाशिकला आणले.

दहा बँक खाती सील

त्यांच्याकडील चौकशीतून त्यांचे इतरही साथिदार असल्याचे लक्षात आले आहे. या संशयितांची दहा बँक खाती सील केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त संग्रामसिंह निशानदार यांनी सांगितले. उर्वरीत संशयितांना अटक करण्यासाठी सायबर पोलिसांचे आणखी एक पथक दिल्ली येथे पाठवण्यात येणार आहे. संशयितांनी स्वत:च्या नावे बँक खाती तयार केली असून त्यामार्फत ते फसवणूकीचे पैसे काढत असल्याने त्यांनाही या गुन्ह्यात आरोपी करणार असल्याचे निशानदार यांनी सांगितले. 

नागरिकांनी डेटींग ॲपचा वापर सावधगिरीने करावा. सोशल मीडियावरुन अनोळखी व्यक्तींसोबत कोणताही आर्थिक व्यवहार किंवा व्यवसाय करु नये. या गुन्ह्यात इतर संशयितांचाही सहभाग असून त्यांना पकडण्यात येईल. तसेच या संशयितांनी इतर नागरिकांची फसवणूक केली आहे का याचाही तपास केला जात आहे. 
-संग्रामसिंह निशानदार, (पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा नाशिक) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

Navi Mumbai News: नवी मुंबईत ७० हजार वाहनांचा चक्का जाम, नागरिकांसह आयात निर्यातदारांना मोठा फटका

Latest Maharashtra News Updates : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुक्ताई पालखीचे दर्शन घेत स्वागत केले

Thane Crime: ठाणे हादरलं! भाजप आमदारांच्या घरासमोरच गोळीबार; १ जण गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT