Nashik Police Bharti 225 Eligible for Police Interview news esakal
नाशिक

Nashik Police Bharti: पोलिसपाटलांच्या मुलाखतीसाठी 225 पात्र; उद्या कागदपत्रांची पडताळणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police Bharti: येवला व नांदगाव तालुक्यांतील रिक्त ६१ पोलिसपाटलांच्या जागांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. (Nashik Police Bharti 225 Eligible for Police Interview news)

परीक्षेत किमान अर्हता गुण मिळवून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी सोमवार (ता.१८)पासून तर बुधवार (ता. २०)पर्यंत आवश्यक त्या कागदपत्रांसह येवल्याच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात वेळेत हजर राहावे, असे आवाहन प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी केले आहे.

येवला व नांदगाव तालुक्यांत ६१ ठिकाणी पोलिसपाटलांची पदे रिक्त आहेत. यासाठी अनेक अर्ज दाखल झाले होते. त्यांच्यातील किमान अर्हता गुण मिळवून मुलाखतीसाठी २२५ जण पात्र ठरले आहेत.

पोलिसपाटीलपदाचा फॉर्म भरताना अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती व छायांकित स्वसाक्षांकित प्रतींसह उपस्थित राहावे.

उमेदवारांनी नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हतेसंबंधी प्रमाणपत्रामधील त्यांना लागू असलेली प्रमाणपत्रे सोबत ठेवावीत. नेमून दिलेल्या तारखेस अनुपस्थित राहिल्यास त्यांच्या कागदपत्रांची पडताळी केली जाणार नाही, अशी माहिती श्री. गाढवे यांनी दिली. याबाबत गावनिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT