Police chief of Lasalgaon arrested while accepting bribe  esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : लासलगावच्या पोलिस नाईकास 5 हजारांची लाच घेताना अटक

Nashik News : पाच हजारांची लाच घेताना लासलगाव पोलिस ठाण्याच्या पोलिस नाईकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव : पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी अटक न करता न्यायालयात पाठविण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना लासलगाव पोलिस ठाण्याच्या पोलिस नाईकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. कैलास सदाशिव बिडगर (वय ४२) असे लाच घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. (Police chief of Lasalgaon arrested while accepting bribe of 5 thousand)

यातील तक्रारदार डोंगरगाव (ता. निफाड) येथील राहिवासी असून, ते शेती करतात. त्यांच्याविरुद्ध लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. कैलास बिडगर या गुन्ह्याचे तपासी अंमलदार आहेत. या गुन्ह्यात तक्रारदारांना अटक न करता न्यायालयात पाठवून मदत करण्यासाठी बिडगर यांनी तक्रारदाराकडे दहा हजारांची लाच मागितली.

तडजोडीअंती पाच हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. (latest marathi news)

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी.

उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर, हवालदार संदीप वणवे, शिपाई संजय ठाकरे, चालक पोलिस नाईक परशुराम जाधव यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, Video: बुमराहने कपिल देव यांचा विक्रम मोडल्यानंतर केलं नव्हतं सेलिब्रेशन, पण नंतर सिराजनं जे केलं, त्याने जिंकली मनं

Drunk Driving : शिवनेरीच्या मद्यधुंद चालकाला अटक, सेवेतून बडतर्फ; एसटी प्रशासन करणार आर्थिक दंड

Pankaja Munde: गोपीनाथ मुंडेंची तिसरी लेक राजकारणात; यशश्री मुंडेंचा उमेदवारी अर्ज, प्रितम मुंडे बिनविरोध?

Latest Marathi News Updates : इंधनपुरवठा ठप्प झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचा अपघात; धक्कादायक माहिती समोर

CM Devendra Fadnavis: धार्मिक स्थळांवरील भोंगे हटविले; फडणवीस : तक्रारदाराला दंडाची ५० टक्के रक्कम देण्याचा विचार

SCROLL FOR NEXT