Nashik Police Commissioner walk on Golf Club Ground esakal
नाशिक

Nashik Police Morning Walk : नाशिक पोलीस आयुक्तांची ‘गोल्फ’वर पायी रपेट! समस्या मनपाच्या; मांडल्या पोलीस आयुक्तांसमोर

Nashik News : शहर पोलीस आयुक्तालयाकडून शहरावासियांसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा प्रतिसाद जाणून घेण्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police Morning Walk : शहर पोलीस आयुक्तालयाकडून शहरावासियांसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा प्रतिसाद जाणून घेण्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. शनिवारी (ता. २४) पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Nashik Police Commissioner) यांनी आपल्या ताफ्यासह गोल्फ क्लब जॉगींग ट्रॅकवर पायी फेरफटका मारत वॉकिंगसाठी आलेल्यांशी संवाद साधला. (Nashik Police Commissioner walk on golf club marathi news)

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आपल्या ताफ्यासह गोल्फ क्लब जॉगींग ट्रॅकवर पायी फेरफटका मारत वॉकिंगसाठी आलेल्यांशी संवाद साधला

शहरातील ३५ जॉगींग ट्रॅकवर सुमारे दीडशे पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भेट देत नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच, पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी आयुक्तांच्या व्हॉटसॲप हेल्पलाईन ९९२३३२३३११ यावर संपर्क साधण्याचेही आवाहन केले.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे, मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गोल्फ क्लब जॉगींग ट्रॅकवर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्यांसमवेत वॉक केला. यावेळी आयुक्तांनी ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ महिला, युवक, खेळाडूंशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी नागरिकांनी बहुतांशी समस्या या महापालिकेशी निगडित असलेल्याच पोलीस आयुक्तांसमोर मांडल्या. त्यावेळी आयुक्तांनी पुढच्या वेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही आपल्या मॉर्निंग वॉकमध्ये सामावून घेऊ असे आश्वासन दिले.

पोलिसिंगबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले. असे असले तरी आयुक्तांनी आपआपल्या परिसरातील घडामोडींची, टवाळखोरांची, गैरकृत्यांची माहिती ९९२३३२३३११ या व्हॉटसॲप क्रमांकावर द्यावी, असे आवाहन केले. (Latest Marathi News)

खेळाडूंना संदेश

स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे काही युवक मैदानावर असताना त्यांच्याशी आयुक्तांनी संवाद साधला. २४ तासांपैकी ६ तास विश्रांती घ्या, उर्वरित १८ तास अभ्यास केला तर यश हमखास मिळेल, असा संदेश देत शुभेच्छा दिल्या.

रात्रीला मद्यपींचा अड्डा

गोल्फ क्लब मैदानासारखे मैदान शहरात दुसरे नाही. परंतु, रात्रीच्या वेळी मद्यपींकडून पार्ट्या केल्या जातात. जागोजागी मद्याच्या बाटल्या, चकण्याचे पाकिटे, प्लॅस्टिकचा कचरा काही नागरिकांनी आयुक्तांना दाखविला. मद्यपींकडून मैदानावरील हिरवळीचे नुकसान केले जाते. याठिकाणी रात्रीची गस्ती मारण्याची मागणी नागरिकांनी केली.

पार्किंगची गैरसोय

गोल्फ क्लबला दररोज हजारो नागरिक जॉगींगसाठी येतात. परंतु वाहन पार्किंग नसल्याने गैरसोय होत असल्याची तक्रार केली. महापालिकेने इदगाह मैदानाचे गेट सुरू केले तर पार्किंगची समस्या सुटण्यास मदत होईल. रस्त्यालगत पार्क केल्याने वाहनांचे नुकसान होते. बर्याचदा वाहन चोरीला जातात. कॉलनी रस्त्यांमध्ये वाहने पार्क करता येत नसल्याचेही नागरिकांनी सांगितले. (Latest Marathi News)

सिग्नल, रिक्षा अन् सिटीलिंक

यावेळी आयुक्तांसमोर अनेकांनी सिग्नलचे उल्लंघन, रिक्षाचालकांच मुजोरपणा अन्‌ सिटीलिंक बसच्या चालकांची अरेरावीच्या तक्रारी केल्या. सिग्नल असूनही उल्लंघन कसे होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे गंजमाळ सिग्नल असल्याचे यावेळी नागरिकांनी आयुक्तांना सांगितले.

याबाबत आयुक्तांनी वाहतूक शाखेला यासंदर्भात कारवाई करण्याच्या सूचना केल्या. तसेच, सिग्नल्सवर रिक्षाचालकांच्या गराड्याने होणारी कोंडी, तर, सिटीलिंक बसचालकांकडून वाहन चालविताना केली जाणारी अरेरावीच्याही तक्रारी आयुक्तांकडे केल्या.

सायकलिंग पेट्रोलिंग करा

तर, यावेळी एका ज्येष्ठ नागरिकाने आयुक्तांना पोलीस वाहनातून पेट्रोलिंग करण्याऐवजी सायकलिंन पेट्रोलिंग करण्याची सूचना केली. गस्तवरील वाहन सायरन वाजवत येण्याचे गुन्हेगार सतर्क होऊन पसार होतात. त्याऐवजी सायकलवर आले तर गुन्हेगारी जागेवर सापडतील असेही ते म्हणाले. त्यावर आयुक्तांनी लवकरच त्याची अंमलबजावणीचे आश्वासन दिले.

नको त्यांचाच गराडा

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे गोल्फ क्लब मैदानावर आलेल्या नागरिकांशी संवाद साधण्यासाठी पोहोचले खरे, परंतु काही जणांनी त्यांना गराडा घातला तो शेवटपर्यंत. त्यामुळे आयुक्तांनाही नाईलाजाने अनेकांशी संवाद साधताना अडचणी येत होत्या. नेहमीच्याच या ठराविक व्यक्तींमुळे आयुक्तांशी मैदानावरील काही जॉगर्स ग्रुपला संवाद साधता आला नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

APL 2025: ६,६,६,४,४,४... पी अर्जुन तेंडुलकरचा १२ चेंडूत धुमाकूळ! स्फोटक फलंदाजीनं वेधलं लक्ष

Nashik Crime : अघोरी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नाशिकमध्ये भोंदूबाबावर पोक्सोचा गुन्हा

'पहाटेची वेळ आणि बसमध्ये पुरुषांचे घाणेरडे स्पर्श' भारती सिंहने सांगितला भयंकर अनुभव म्हणाली...'त्याने मला घट्ट पकडलं आणि...'

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT