Sandip Karnik on X
Sandip Karnik on X esakal
नाशिक

Nashik Police : पोलिस आयुक्त X वर येणार लाइव्ह! नाशिककरांना लवकर साधता येणार संवाद

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना, त्याचा खुबीने वापर करण्याचा प्रयत्न नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक करताना दिसत आहेत. व्हॉटसॲप हेल्पलाइन, जीपीएस- सुरक्षित नाशिक ॲपनंतर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलिस आयुक्त कर्णिक थेट नाशिककरांशी संवाद साधणार आहेत.

तोही लाइव्ह. ट्विटरच्या ‘एक्स’ हॅण्डलवरून आयुक्त नाशिककरांशी संवाद साधताना त्यांच्या प्रश्नांना सामोरे तर जातीलच, शिवाय नाशिककरांनी सुचविलेल्या सूचनांचीही दखल घेणार आहेत. त्यामुळे नाशिककरांना आपल्या व शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून समस्या मांडण्याचीही संधी मिळणार आहे. पोलिस आयुक्तालयाकडून लवकर दिवस आणि वेळेची माहिती दिली जाणार आहे. (Nashik Police Commissioner will come live on X handle news)

आयुक्त कर्णिक यांनी पदभार घेतल्यापासून सातत्याने सोशल मीडियाचा पोलिसिंगसाठी खुबीने वापर करण्याचा प्रयत्न केला आहे. आयुक्तांच्या या प्रयत्नांना यशही येते आहे. सोशल मीडियाचा वापर नाशिककरही करतात. त्यातही एक्स हॅण्डलवर मोठ्या संख्येने नाशिककर आहेत.

तर, नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या एक्स हॅण्डलवर सुमारे ५० हजार नाशिककर फॉलो करतात. त्यामुळे आयुक्त कर्णिक यांनी एक्स हॅण्डलवर नाशिककरांशी लाइव्ह संवाद साधणार आहे. येत्या आठवडाभरात आयुक्त कर्णिक यांच्याकडून हा उपक्रम राबविला जाणार आहे.

‘एक्स लाइव्ह विथ सीपी’चे नियोजन सुरू असून, त्यासंदर्भातील वेळ व दिवस नाशिक पोलिस ‘एक्स हॅन्डल’वर अपलोड करण्यात येणार आहेत. व्हॉटसॲप हेल्पलाइनवरही अनेकदा नागरिकांनी केलेल्या सूचनांनुसार पोलिसांनी धडक कारवाई केली असून अजूनही ती सुरू आहे.

या हेल्पलाइनला चांगला प्रतिसादही लाभला आहे. तर नुकतेच ‘पोलिस ग्राउंड प्रेझेन्स’ हे ॲप पेट्रोलिंगसाठी सुरू करण्यात आलेले आहे. आता, आयुक्त स्वतः ‘एक्स’ हॅण्डलवरुन नाशिककरांशी मेसेज स्वरूपात लाइव्ह संवाद साधणार आहेत. (latest marathi news)

नाशिककरांना संधी

एरवी, नाशिक शहर पोलिसांच्या एक्स हॅण्डलवर नाशिककर शहरातील समस्यांबाबत संदेश (मेसेज) पाठवितात. त्याची दखलही पोलिस आयुक्तालयाकडून घेतली जाते. परंतु आता थेट पोलिस आयुक्तांशी संवाद साधत असताना नाशिककरांना आपल्या समस्या मांडता येतील. शहरातील गुन्हेगारी, टवाळखोर, वाहतूक समस्यांबाबत थेट पोलिस आयुक्तांना संदेशाच्या माध्यमातून संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

"एक्स हॅण्डलच्या माध्यमातून नाशिककरांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. नाशिकच्या सुरक्षिततेसाठी नाशिककरांकडूनच जाणून घेण्याची आणि त्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचा नाशिक पोलिस प्रयत्न करतील. तर लवकरच भेटू ‘एक्स’वर."

- संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT