Sandeep Karni 
नाशिक

Nashik Police Helpline : व्हॉट्सॲप हेल्पलाईनच्या तक्रारींना आयुक्तालयाचा क्विक रिस्पॉन्स!

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेनुसार गेल्या डिसेंबर महिन्यात ९९२३३२३३११ या क्रमांकाची व्हॉटसॲप हेल्पलाईन सुरू करण्यात आली होती.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सोशल मीडियाच्या माध्यमातून नाशिककरांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या व्हॉट्सॲप हेल्पलाईनवर प्राप्त झालेल्या तक्रारींना शहर पोलिसांनी ‘क्विक रिस्पॉन्स’ देत त्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.

आयुक्तांच्या व्हॉट्सॲप हेल्पलाईनवर गेल्या अडीच महिन्यात १२३९ संदेश पाठविले होते. (Nashik Police Commissionerate quick response to WhatsApp helpline complaints news)

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेनुसार गेल्या डिसेंबर महिन्यात ९९२३३२३३११ या क्रमांकाची व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू करण्यात आली होती. त्यापूर्वीच शहर पोलिस एक्स (ट्विटर)च्या माध्यमातून नाशिककरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता.

त्यावरही नाशिककरांनी तक्रारी केल्या होत्या. परंतु त्याची मर्यादा लक्षात घेता आयुक्तांनी व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू केली. गेल्या अडीच महिन्यात १२३९ तक्रारी या हेल्पलाईनवर आल्या आहेत. त्यापैकी ५० टक्के मेसेज हे नॉन ॲक्शनेबल असल्याचे त्यातून समोर आले आहे. तर बहुतांशी मेसेज हे शुभेच्छांचेच आहेत.

असे असले तरी, टवाळखोरांचा उपद्रव, वाहतुकीची समस्या, महिला सुरक्षा यासंदर्भातील मेसेज हेल्पलाईनवर आले असता, शहर पोलिसांनी त्या तक्रारींना क्विक रिस्पॉन्स देत त्या सोडविल्याही आहेत.

हेल्पलाइनवर तक्रार प्राप्त होताच संबंधित पोलिस ठाण्याला कळविण्यात येते. एखाद्या तक्रारीसंदर्भात कोणत्या स्वरुपाची कारवाई करावी, अशी समस्या असल्यास पोलिस आयुक्त अथवा संबंधित विभागाच्या उपायुक्तांना कळविण्यात येते.

अनेक कौटुंबिक वादात पोलिसांनी मध्यस्ती करुन वाद मिटविल्याच्याही नोंदी आहेत. महिला सुरक्षेसंदर्भात तक्रारी अल्प असल्या तरी पोलिसांनी त्यावर करडी नजर ठेवली आहे. ‘क्विक रिस्पॉन्स’मुळे नागरिकांनी तक्रारीचे निवारण झाल्यावर आयुक्तालयाचे आभार मानल्याचेही मेसेज आहेत.

पोलिस ठाणे : हेल्पलाइन मेसेज

देवळाली कॅम्प - ६

अंबड - ४४

गंगापूर - २५

सरकारवाडा - १५

इंदिरानगर - ४१

मुंबई नाका - २२

आडगाव - २९

पंचवटी - ३८

भद्रकाली - ३८

उपनगर - ३३

सातपूर - ३१

नाशिकरोड - ३४

म्हसरूळ - १७

सायबर - १९

वाहतूक - २०७

नॉन-ॲक्शनेबल - ६३८

एकूण - १२३९

"व्हॉट्सॲप हेल्पलाईनवर आलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल घेतली जाते. पोलीस ठाणेनिहाय या तक्रारी सोडविण्यास प्राधान्य दिले जाते. स्ट्रीट क्राईम, महिला सुरक्षिततेला शहर पोलिसांचे प्रथम प्राधान्य आहे."- संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayan Ahmed: एक सल्ला, नंतर 'तो' मॅसेज अन् सापळा... अयान अहमदनं तरुणींना जाळ्यात कसं ओढलं? पडद्यामागचा सल्लागार लव्हगुरू कोण?

Latest Marathi News Live Update: बदनापूरमध्ये पाणीटंचाईची दाहकता

KCC Campaign : पशुपालकांसाठी खुशखबर! 'किसान क्रेडिट कार्ड'वर मिळणार ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; राज्य शासनाची विशेष 'KCC' मोहीम

Cricket Viral Video: IPL काय बघताय? इथे तर पठ्ठ्याने मैदानावरच नांगर फिरवला; सामना थेट बंद! खेळाडू, रेफरी अन् प्रेक्षक हैराण

SRH vs CSK: चेन्नईच्या संघात मोठा बदल होणार! स्पर्धेतून बाहेर झालेल्या खलील अहमदची जागा घेण्यासाठी ४ खेळाडूंचे पर्याय

SCROLL FOR NEXT