A used BMW car with number changed. together with Gangapur Crime Squad. esakal
नाशिक

Nashik Traffic Rules Break : ‘BMW’च्या सीरिजमध्ये छेडखानी भोवली; इंग्लिश सीरिजमध्ये केला ‘ई’चा‘जे’

Traffic Rules Break : वाहनांसाठी असलेला क्रमांक मनाप्रमाणे बदलता येत नाहीत. पण हौशी तरुणाला त्याच्या नावानुसार वाहनांचा क्रमांक व सीरिज पाहिजे होती.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वाहनांसाठी असलेला क्रमांक मनाप्रमाणे बदलता येत नाहीत. पण हौशी तरुणाला त्याच्या नावानुसार वाहनांचा क्रमांक व सीरिज पाहिजे होती. क्रमांक मिळाला पण सीरिज नाही मिळाली. त्यामुळे त्याने त्याच्याच मनमर्जीपणे क्रमांकातील इंग्लिश सीरिजमध्ये स्वत:च्या नावाचे अद्याक्षरे टाकली. तीही बीएमडब्ल्यु कारला. मग काय, त्याच क्रमाकांच्या दुसर्या मर्सिडिज कार मालकाच्या फास्टटॅगमधून टोलचे पैसे ‘कट’ होऊ लागल्याने त्याने थेट पोलिसात धाव घेत तक्रार दिली. (nashik police detained 2 accused of them and registered case of number plate teased )

गंगापूर पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला असून, त्यांची बीएमडब्ल्युही ताब्यात घेतली आहे. दोघा युवकांना त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे केलेला प्रताप चांगलाच महागात पडला आहे. जुनेद इब्राहिम शेख (लॅमरोड, विहितगाव, नाशिकरोड), सरफराज अल्ताफ कुरेशी (रा. शांतीपार्क, उपनगर) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. सचिन दिलीप गुळवे (रा. सहदेवनगर, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या स्वमालकीच्या मर्सिडीज कारचा एमएच १५ जेएस ८००० असा आहे.

परंतु, ५ एप्रिल रोजी गुळवे मोबाईलवर ट्रॅफिक पोलिसांच्या दंडाचे तीन ऑनलाईन चलान थकीत असल्याचा संदेश आला. तसेच, ५ ते १४ एप्रिलदरम्यान मर्सिडीज कारवरील फास्टटॅग अकाउंटमधून ‘टोल’ रक्कम डेबिट झाल्याचे चार मॅसेज आले. प्रत्यक्षात त्यांची मर्सिडीज कार घराच्याच पार्किंगमध्ये होती. त्यामुळे त्यांना धक्का बसला. याबाबत त्यांनी शहर वाहतूक शाखा व घोटी टोलनाका येथे चौकशीदेखील केली.

त्यावरून गुळवे यांच्या मर्सिडीज कारचा एमएच १५ जेएस ८००० या क्रमांकाची दुसरी एक बीएमडब्ल्यु कार शहरात फिरत असल्याचे त्यांना समजले. गुळवे यांनी तात्काळ गंगापूर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास सुरू केला. एमएच १५ जेएस ८००० या क्रमांकाची बीएमडब्ल्यू कार पुन्हा घोटी टोलनाका येथून नाशिकच्या दिशेने येत असल्याची खबर पोलिसांना मिळाली असता, पथक तात्काळ घोटीत पोहोचले अणि बोगस नंबरप्लेट लावून फिरणारी बीएमडब्ल्यू कार (एमएच १५ ईएस ८०००) ताब्यात घेतली.

यावेळी पोलिसांनी संशयित जुनेद इब्राहिम शेख, सर्फराज अल्ताफ कुरेशी यांना ताब्यात घेतले. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, अंमंलदार गोरख साळुंके, मच्छिंद्र वाकचौरे, रमेश गोसावी यांनी बजावली. तपास महिला उपनिरीक्षक नेहा सोळंके, अंमलदार शिवम साबळ करीत आहे.

अट्टाहास नडला

संशयित जुनेद, सरफराज हे दोघेही सुशिक्षित असून एकाची माबाईल शॉपी तर दुसरा स्टेशनरीचा पुरवठादार आहे. दरम्यान, जुनेदने काही महिन्यांपूर्वी २० लाखांत ‘सेंकडहँन्ड’ बीएमडब्ल्यू कार खरेदी केली. मात्र गाडीच्या नंबरमध्ये त्यास नावानुसार (एमएच १५ जेएस ८०००) हा नंबर हवा होता.

मात्र, गाडीला मूळ नंबर एमएच १५ ईएस ८००० असा मिळाला. जुनेद यास त्याच्या नावाप्रमाणे, जेएस ८००० असा क्रमांक पाहिजे होता. क्रमांक मिळाला पण इंग्लिश सीरिज नाही मिळाला. त्यामुळे संशयित जुनेद याने त्याच्या नावाच्या अद्याक्षरे ‘जेएस’ असा बदल करुन घेत तो बीएमडब्ल्युला लावला. ईस-चे - जेएस असा बदल करीत वाह्तूक नियमांचे उल्लंघन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : पुणे जिल्ह्यात 3 लाख कुणबी नोंदी, जुन्नर- खेडमध्ये सर्वाधिक दाखले; मराठा आरक्षण जीआर आधीच आकडेवारी समोर

Asia Cup 2025 AFG vs HK : अफगाणिस्तानची विजयी सलामी, आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात हाँगकाँगचा दारुण पराभव...

Latest Marathi News Updates : आज मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Panchang 10 September 2025: आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण व ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

Education : राज्यात शिक्षणगळती चिंताजनक; इयत्ता नववी-दहावीतील ११.५ टक्के विद्यार्थी शिक्षणातून बाहेर

SCROLL FOR NEXT