Nashik Police on Crime esakal
नाशिक

Nashik Police: पोलीस सध्या करताय तरी काय...? अल्पवयीनांच्या हाती कोयते, गुन्हेगारांकडे कट्टे अन टोळ्यांमध्ये होतोय गोळीबार

Crime News : सिडकोतील अंबड लिंकरोडवरील जीएसटी कार्यालयासमोर रविवारी (ता. ७) मध्यरात्री दोन गुन्हेगारी टोळ्यांमध्ये झालेल्या गोळीबारीच्या घटनांनी शहर पुन्हा हादरले आहे.

नरेश हाळणोर

Nashik Police : सिडकोतील अंबड लिंकरोडवरील जीएसटी कार्यालयासमोर रविवारी (ता. ७) मध्यरात्री दोन गुन्हेगारी टोळ्यांमध्ये झालेल्या गोळीबारीच्या घटनांनी शहर पुन्हा हादरले आहे. शहरात सातत्याने गोळीबाराच्या घटना घडत असताना, अल्पवयीन मुलांकडे सर्रासपणे कोयते, सुरे, चॉपर आढळून येत आहेत तर सराईत गुन्हेगारांकडे गावठी कट्टे यामुळे शहरात गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये कधीही गँगवारचा भडका उडू शकतो अशीच परिस्थिती असताना, सध्या पोलीस करताय तरी काय, असा रास्त प्रश्न सर्वसामान्या नाशिककरांना पडला आहे. (Nashik Police increased crime rate in city news)

लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरू आहे. निवडणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिसांकडून काटेकोर उपाययोजना केल्या जात आहेत. अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाई सुरू आहे. सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित केली जात असतानाच, गुन्हेगारीकडे वळण घेत असलेल्या विधीसंघर्षित बालकांचे समुपदेशन केले जात आहे. त्यासाठी सातत्याने उपक्रम राबविले जात आहेत. तसेच, शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना केल्या जात आहेत.

असे असतानाही शहरातील गुन्हेगारीवर आळा बसला आहे, असे मात्र दिसून येत नाही. सातत्याने गुन्हेगारी घटना घडत आहेत. अल्पवयीन मुलांकडे सर्रासपणे कोयते, सुरा, चाकू, चॉपर आढळून येत आहेत. तर गावठी कट्टे बाळगून दहशत माजविणारेही पोलिसांच्या हाती लागत आहेत.

साधारणत: दिवसाआड आर्मॲक्ट अन्वये गुन्हे पोलिस ठाण्यांमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे शहरातील गुन्हेगारांकडे हत्यारे आहेत तरी किती? या गुन्हेगारांकडे हत्यारे येतात तरी कोठून? असा प्रश्न नाशिककरांसमोर उपस्थित होत असून, पोलिस यंत्रणा मात्र सुस्तावल्याची टीका नागरिक करू लागले आहेत.

एकाच टोळीविरोधात गुन्हा ?

सिडकोतील त्रिमूर्ती चौक - अंबड लिंकरोडवरील जीएसटी कार्यालयासमोर दोंदे व शिर्के या सराईत गुन्हेगारांच्या टोळीमध्ये भडका उडाला आणि गोळीबार झाला. याप्रकरणी अंबड पोलिसात दोंदे टोळीविरोधात प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल झाला असून सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

यावेळी दोन्ही टोळ्यातील संशयितांच्या हाती तलवारी होत्या. असे असतानाही शिर्के टोळीविरोधात मात्र गुन्हा दाखल न केल्याने पोलिसांचीच भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दोन्ही टोळ्या या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कातील असल्याने पोलिसांवर राजकीय दबाव असल्याची चर्चा सिडकोवासियांमध्ये आहे.

गुन्हेगारांना हवे वर्चस्व

राजकीय आश्रम मिळवून व्हाईटकॉलर झालेल्या गुन्हेगारांना पाहून शहरात गावठी कट्टे बाळगून दादागिरी करणाऱ्यांनाही आपले वर्चस्व दाखवायचे आहे. त्यासाठी अशा दादागिरी करणाऱ्या गुन्हेगारांकडून खुलेआम गोळीबार, हातात तलवारी बाळगून शहर परिसरात दहशत माजविण्याचे प्रकार अलिकडे वाढले आहेत. अशा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान शहर पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

तीन महिन्यात सापडलेली हत्यारे

- गावठी कट्टे : २१

- हत्यारे (तलवार/चॉपर) : ६९

- जिवंत काडतुसे : २०

"स्ट्रीट क्राईमविरोधात धडक कारवाई सुरू आहे. सराईत गुन्हेगारांविरोधातही तडीपारी, स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे. शहरभर पेट्रोलिंगमध्ये वाढ करण्यात आली आहे. शहरातील गुन्हेगारी कोणत्याही परिस्थितीमध्ये खपवून घेतली जाणार नाही."

- प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त, शहर गुन्हेशाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT