Sinner MIDC Police Station Senior Inspector Yashwant Baviskar issuing a notice to Bharat Dighole, founder president of Maharashtra State Onion Growers Farmers Association in the wake of Prime Minister Narendra Modi's meeting. esakal
नाशिक

Nashik Police : कांदाप्रश्नी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या नोटिसा!

Nashik News : महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांना सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यशवंत बाविस्कर यांनी नोटीस बजावली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी (ता. १५) पिंपळगाव बसवंत येथे जाहीर सभा होत आहे. या वेळी कांदाप्रश्नी जिल्ह्यातील संघटना, शेतकऱ्यांकडून आंदोलन होण्याची शक्यता गृहित धरून ग्रामीण पोलिसांकडून जिल्ह्यातील कांदा उत्पादक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आज नोटिसा बजावण्यात आल्या. (notice to office bearers of Onion Producers Association)

पंतप्रधान मोदी यांच्या सभेवेळी कांदा उत्पादक संघटना व शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या आदेशान्वये ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत कांदा उत्पादक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना कलम १४९ अन्वये व जमावबंदीचा आदेशाचे उल्लंघन करू नये म्हणून मंगळवारी (ता. १४) नोटिसा बजावण्यात आल्या. (latest marathi news)

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांना सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यशवंत बाविस्कर यांनी नोटीस बजावली.

याचप्रमाणे जिल्ह्यातील कांदा उत्पादक संघटनेसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Men Hockey Asia Cup: भारत पुन्हा आशियाचा बादशाह! आशिया कप फायनलमध्ये कोरियाचा पराभव, चषकावर चौथ्यांदा ताबा मिळवला

Lalbaugcha Raja Visarjan: सर्व अडथळे पार करून ३३ तासांच्या मार्गक्रमणानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न

Mohol News : सोलापूर-पुणे महामार्गावर अज्ञात पुरुषाचा कुजलेला मृतदेह सापडला, मोहोळ पोलिसांचा तपास सुरू

Ganpati Visarjan 2025 : देगलूरनगरीत ढोल, ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप; पुढच्या वर्षी लवकर या... या घोषणेने शहर दुमदुमले...!

उत्सवप्रिय सोलापुरात पहिल्यांदाच डीजेमुक्त मिरवणुका! पोलिस आयुक्तांचे मायक्रो प्लॉनिंग, सोलापूर कृती समितीसह सर्व सोलापूरकरांचा पुढाकार

SCROLL FOR NEXT