Police personnel verifying the candidates who appeared at the examination center of KTHM College for the police recruitment written test. In the second photo, Police Commissioner Sandeep Karnik inspecting the classroom. esakal
नाशिक

Nashik Police Recruitment : पोलिस भरतीची लेखी परीक्षा सुरळीत; आज नोंदविता येणार हरकती

Police Recruitment : पोलिस भरतीसाठीची लेखी परीक्षा रविवारी (ता. ७) सुरळीत पार पडली असून, दुपारी उत्तर पत्रिकाही जारी करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police Recruitment : पोलिस भरतीसाठीची लेखी परीक्षा रविवारी (ता. ७) सुरळीत पार पडली असून, दुपारी उत्तर पत्रिकाही जारी करण्यात आली आहे. यावर सोमवारी (ता. ८) दुपारी दोन वाजेपर्यंत हरकती घेता येणार आहे. दरम्यान, जुलै अखेरपर्यंत लेखी परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना पोलिस प्रशिक्षणासाठी रवाना केले जाण्याची शक्यता आहे. मुंबई वगळता राज्यात पोलिस भरतीसाठीची लेखी परीक्षा घेण्यात आली. (written exam is going smoothly today objections can be filed )

गेल्या आठवड्यात मैदानी चाचणी आटोपल्यानंतर कट ऑफ जाहीर करून रविवारी (ता. ७) लेखी परीक्षा घेण्यात आली. नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या रिक्त ११८ पोलिस शिपाई पदांसाठीची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. मैदानाची चाचणीनंतर कटऑफनुसार १ हजार १९७ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले होते. तर, नाशिक ग्रामीणमध्ये ३२ रिक्त शिपाईपदांसाठीची प्रक्रिया राबवून लेखी परीक्षेसाठी ३१६ उमेदवार पात्र ठरले होते.

शहर पोलिस आयुक्तालयाची लेखी परीक्षा गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविदयालयात तर, ग्रामीण दलाची लेखी परीक्षा आडगावच्या भुजबळ नॉलेजसिटी महाविद्यालयात घेण्यात आली. परीक्षार्थींना पोलिस प्रशासनाकडून पेन आणि पॅड पुरविण्यात आले. तसेच, मोबाईल वा इलेक्ट्रॉनिक्स साहित्य परीक्षा केंद्रात आणण्यास मनाई करण्यात आली होती. (latest marathi news)

लेखी परीक्षेसाठी येणाऱ्या

उमेदवारांनी रविवारी (ता. ७) सकाळी सात ते नऊ या दरम्यान हजर राहण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार, उमेदवारांनी हजेरी लावली. यावेळी परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी पोलिस प्रशासनाकडून उमेदवारांची बायोमेट्रिक चाचणी घेण्यात आली. उमेदवाराचे प्रवेश पत्र, ओळखपत्र, चेस्टनंबर आणि फोटो घेतल्यानंतर परीक्षा केंद्रात सोडण्यात आले. सकाळी अकरा ते साडेबारा वाजेपर्यंत दीड तासांची लेखी परीक्षा घेण्यात आली. लेखी परीक्षा सुरळीत पार पडली असून कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलीस प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

१५ उमेदवारांची दांडी

दरम्यान, शहर पोलीस आयुक्तालयाने घेतलेल्या लेखी परीक्षेला १ हजार १९७ उमेदवारांपैकी १ हजार १८२ उमेदवारांनी हजेरी लावली. तर, १५ उमेदवारांनी आजच्या लेखी परीक्षेला दांडी मारली. परीक्षा आटोपल्यानंतर दुपारी १ वाजता पोलीस आयुक्तालयाने लेखी परीक्षेची उत्तर पत्रिकाही पोलीस आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर आणि आयुक्तालयाबाहेर नोटीस फलकावर जारी केली आहे. या संदर्भात हरकती सोमवारी (ता. ८) दुपारी दोन वाजेपर्यंत घेता येणार आहे.

महिनाअखेरीस प्रशिक्षण

येत्या आठवडाभरात लेखी परीक्षेतून पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर या उमेदवारांची वैदयकीय चाचणीचे सोपस्कार पार पाडण्यात येईल. त्यानंतर जुलै महिनाअखेरपर्यंत ११८ जणांच्या प्रशिक्षणार्थी पोलीस उमेदवारांना प्रशिक्षणासाठी रवाना केले जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT