Nashik police take bold action against sandalwood thief in Jalna Marathi Crime News
Nashik police take bold action against sandalwood thief in Jalna Marathi Crime News  
नाशिक

जमावाच्या सुरक्षेतून ‘पुष्पा’ला पकडले; नाशिक पोलिसांची जालन्यात कारवाई

विनोद बेदरकर

नाशिक : नाशिक विशेष पोलिस महानिरीक्षक, कारागृह अधीक्षकांच्या बंगल्यासह कारागृहाची सुरक्षा भेदून चंदनाची झाडे तोडणाऱ्या सराईत जावेदखाँ पठाण याला नाशिक शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. जालना येथे जाऊन गुन्हे शाखेच्या युनीट एकने ही कारवाई केली. कारवाई दरम्यान त्याच्या नातेवाईकांनी कारवाईला विरोध करतांना गोंधळ घातला. पण पोलिसांनी जोखीम घेत उचलून आणले.

जावेदखाँ अजीजखाँ पठाण (रा. कठोरबाजार, भोकरदन, जि. जालना) असे अटक केलेल्या संशयित चंदनचोर पुष्पाचे नाव आहे. युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांना नाशिकमध्ये शासकीय आस्थापनांच्या सुरक्षा यंत्रणा भेदून चंदनचोरी करणारी टोळी जालन्यात कठोरबाजार येथे असल्याची माहीती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून जालन्यात जाऊन कारवाई केली.

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक प्रमोद वाघ यांच्या सरकारी निवासस्थानाची सुरक्षा भेदून चोरट्यांनी चंदनाची पाच झाडे चोरली होती. त्यानंतर चार दिवसांनी परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या गडकरी चौकात गोदावरी बंगल्याच्या आवारातून १२ हजार रुपयांचे चंदनाचे झाड तोडून चोरून नेले. दोन्ही ठिकाणच्या पोलिसांच्या सुरक्षा यंत्रणा भेदून चोरट्यांनी चंदनाची झाड चोरून नेल्याचे समोर आले होते. तर सातपूर येथील शासकीय आयटीआय जवळील पोस्ट कार्यालय आवारातून चोरट्याने चंदनाचे झाड चोरले होते. शहर पोलिसांच्या पथकाने कठोर भागात सापळा रचला. जावेदखाँ याला अडवित ताब्यात घेत असताना बाजारातील जावेदखाँच्या नातेवाईकांसह आप्तस्वकियांनी पोलिस कारवाईला विरोध करीत गोंधळ घातला. पोलिसांनी युक्ती वापरुन जावेदला उचलून आणले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत पवारांना पाहण्यासाठी गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली आहे

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: दमदार सुरुवातीनंतर चेन्नई संघ सापडला अडचणीत; दुबेनंतर जडेजाही स्वस्तात बाद

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT