Police Transfer esakal
नाशिक

Nashik Police: आयुक्तालय हद्दीतील अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा खांदेपालट! पंचवटीचे कड यांच्याकडे गुन्हेशाखा युनिट एकचा अतिरिक्त भार

Police Transfer : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बहुतांशी पोलीस निरीक्षकांच्या परजिल्ह्यात बदल्या तर परजिल्ह्यातून नाशिक आयुक्तालयात नव्याने अधिकारी हजर झाले आहेत

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police Transfer : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बहुतांशी पोलीस निरीक्षकांच्या परजिल्ह्यात बदल्या तर परजिल्ह्यातून नाशिक आयुक्तालयात नव्याने अधिकारी हजर झाले आहेत. पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये मुंबई नाका पोलीस ठाण्याची जबाबदारी छत्रपती संभाजीनगर येथून आलेले अशोक गिरी, पुण्यातून आलेले जयराम पायगुडे यांना अंमलीपदार्थविरोधी व खंडणीविरोधी पथकाची जबाबदारी देण्यात आली.

तर, मुंबई नाक्याचे युवराज पत्की यांची विशेष शाखेत आणि पंचवटीचे मधुकर कड यांच्याकडे शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. (Nashik Police transfer in commissionerate area marathi news)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शहर आयुक्तालयात तीन वर्षे सेवा केलेले व स्थानिक असलेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्या परजिल्ह्यात करण्यात आल्या. त्याचप्रमाणे, नाशिक आयुक्तालयात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, संभाजीनगर येथून पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यानुसार आत्तापर्यंत पाच पोलीस निरीक्षक आयुक्तालयात रुजू झाले आहेत.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी रूजू झालेल्या अधिकार्यांना आयुक्तालय हद्दीतील पोलीस ठाणे, विशेष शाखांमध्ये रूजू होण्याचे आदेश गुरुवारी (ता. ७) सायंकाळी बजावले. तसेच, काही पोलीस अधिकाऱ्यांमध्येही खांदेपालट केली असून, काहींकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

यांची खांदेपालट

मुंबई नाका पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांची विशेष शाखेत, सातपूर पोलीस ठाण्यातून नियंत्रण कक्षात आलेले रणजित नलावडे यांची उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हे शोध तर, वेल्फेअरचे पोलीस निरीक्षक इरफान शेख यांची आर्थिक गुन्हेशाखेत बदली करण्यात आली आहे.

तर, पंचवटीचे मधुकर कड यांच्याकडे शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकची तर, महिला सहायक निरीक्षक सारिका औताडे यांच्याकडे प्रशिक्षण शाखेसह वेल्फेअरची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय ११ पोलीस उपनिरीक्षकांची आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

असे आहेत बदल

पोलीस निरीक्षक ............ नियुक्तीचे ठिकाण

- जयराम पायगुडे ........... अंमलीपदार्थविरोधी व खंडणीविरोधी पथक

- बडेसाह नाईकवाडे.......... नाशिकरोड पोलीस ठाणे, गुन्हेशोध

- जगन्नाथ जानकर ..........सरकारवाडा पोलीस ठाणे, गुन्हेशोध

- अंकुश चिंतामण ..............विशेष शाखा

- अशोक गिरी.................. मुंबई नाका पोलीस ठाणे, प्रभारी

- सहायक निरीक्षक बापू रायकर ........... पंचवटी पोलीस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT