Police wireless system esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : 62 मतदान केंद्रांची ‘वायरलेस’वर भिस्त; मोबाईल नेटवर्क कमी पडल्याने उपाययोजना

Lok Sabha Election : दिंडोरी मतदारसंघातील दुर्गम भागात मोबाईलचे नेटवर्क कमी असणाऱ्या ६२ ठिकाणी पोलिसांची वायरलेस यंत्रणा वापरण्यात येईल.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : लोकसभा निवडणुकीची तयारी पूर्ण झालेली असताना अवकाळी पावसामुळे प्रशासनाला नियोजनात बदल करावा लागला आहे. दिंडोरी मतदारसंघातील दुर्गम भागात मोबाईलचे नेटवर्क कमी असणाऱ्या ६२ ठिकाणी पोलिसांची वायरलेस यंत्रणा वापरण्यात येईल. तसेच, सोमवार (ता. २०)च्या मतदानासाठी रविवारी (ता. १९) सकाळी नऊपासूनच मतदान केंद्राध्यक्षांना साहित्य घेऊन निघण्याच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.(Police wireless system used in 62 places)

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी येत्या सोमवारी मतदान होणार आहे. मतदानासाठी एक आठवड्याचा कालावधी असताना जिल्ह्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची शनिवारी (ता. ११) बैठक घेतली.

यात पावसामुळे काय व्यत्यय येऊ शकतो, याची माहिती जाणून घेतली. सुरगाणा, पेठ, दिंडोरी येथील दुर्गम भागातील मतदान केंद्रांवर मतदान साहित्य घेऊन जाण्यासाठी बस जाऊ शकत नाही. तिथे मिनी बस किंवा छोटा टेम्पो आदी वाहनांतून साहित्य घेऊन जावे. पावसामुळे प्रचलित मार्गावर अडथळा निर्माण झाल्यास दुसऱ्या मार्गाने केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना केंद्राध्यक्षांना दिल्या आहेत. केंद्रावर मोबाईल नेटवर्क मिळत नाही किंवा कमी प्रमाणात आहे.

अशा ६२ ठिकाणी पोलिसांची वायरलेस यंत्रणा वापरण्याचे आदेश आहेत. विशेषत: सुरगाणा व पेठ तालुक्यांतील दुर्गम भागातील मतदान केंद्रांवर वायरलेसचा वापर होईल. रविवारी सकाळपासूनच साहित्य वितरित होण्यास सुरवात होईल. मतदानाच्या दिवशी काही अडचण उद्‌भवल्यास तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन केंद्राध्यक्षांना दिल्या आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एकूण एक हजार ९२२ मतदान केंद्रे आहेत. (latest marathi news)

नाशिकमध्ये एकही दुर्गम केंद्र नाही

नाशिक लोकसभा मतदारसंघात इगतपुरी व त्र्यंबकेश्‍वर तालुक्यांचा समावेश होतो. या तालुक्यांत मोबाईल नेटवर्क मिळत नसलेले एकही केंद्र नसल्याने त्यांना वायरलेस सुविधेची आवश्‍यकता नसल्याचे निवडणूक उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी सांगितले.

"पावसामुळे मतदानास व्यत्यय निर्माण होणार नाही, याची आम्ही पुरेपूर काळजी घेत आहोत. मतदानाच्या एक दिवस आधी सर्व साहित्य सर्व केंद्रांवर पोहोचविले जाईल. मार्गात अडचण असेल तर पर्यायी मार्गाचा विचार केला जाईल. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, हीच अपेक्षा आहे." - बाबासाहेब पारधे, निवडणूक निर्णय अधिकारी (दिंडोरी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

Dombivali News : आमदार राजेश मोरे यांनी पलावा पुलाचे उद्घाटन केले आणि पूल बंद झाला

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

SCROLL FOR NEXT