Crime esakal
नाशिक

Nashik Crime : ‘कमळ’ शेजारी ‘पंजा’ रेखाटल्याने काँग्रेसच्या 6 पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

Crime News : आगामी लोकसभा निवडणुकीला प्रारंभ होण्यापूर्वीच राजकीय पक्षांच्या कुरबुरी सुरू झाल्या असून, त्यावरून गुन्हे दाखल होऊ लागले आहेत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीला प्रारंभ होण्यापूर्वीच राजकीय पक्षांच्या कुरबुरी सुरू झाल्या असून, त्यावरून गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. पाथर्डी फाटा आणि इंदिरानगर परिसरामध्ये भिंतीवर भाजपने रेखाटलेल्या कमळ या चिन्हाशेजारीच काँग्रेसचा पंजा रेखाटल्यामुळे पक्षाच्या चिन्हाचे विद्रुपीकरणप्रकरणी काँग्रेसच्या सहा पदाधिकाऱ्यांविरोधात ‘महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डिफेंसमेंट ऑफ ॲक्ट १९९५ चे कलम-३ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. (Nashik political Crime against 6 office bearers of Congress for drawing hand next to lotus logo of bjp marathi news)

जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसचे सरचिटणीस पंकज सोनवणे, युवक काँग्रेसचे प्रवक्ता महेश देवरे, सोशल मीडियाचे देवेन मारू, त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष गणेश कोठुळे, देवळाली विधानसभा अध्यक्ष हेमंत पवार, उपाध्यक्ष सागर पिपलंके यांच्याविरोधात ऋषिकेश किशोर शिरसाठ (रा. पाटील गार्डन, चार्वाक चौक, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपतर्फे पाथर्डी फाटा येथील आर. के. लॉन्स व केंब्रिज स्कूलजवळ जाहिरात रेखाटली आहे. त्यावर ‘अब की बार फिर से मोदी सरकार’ असा उल्लेख आहे. जाहिरातीजवळील मोकळ्या जागेत ‘कमळ’ चिन्हाशेजारीच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष चिन्ह ‘पंजा’ रेखाटत ‘रोजगार दो, न्याय दो’, असाही उल्लेख केला.

त्यानंतर हे फोटो सोशल मीडियावरील इन्स्ट्राग्रामवर अपलोड केले. त्यावरून पक्षचिन्ह व संदेश रेखाटून पक्ष चिन्हासह प्रॉपर्टीचे विद्रूपीकरण केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी इंदिरानगरचे पोलिस हवालदार एस. पी. गारले हे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: IMDचा मोठा इशारा! मुंबईसह 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; पुढील २ दिवस कसे असेल हवामान?

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधन कधी आहे? राखी बांधण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या मुहूर्त आणि संपूर्ण माहिती

Bhiwandi Building Collapse : भिवंडी इमारत दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू; बालकासह आणखी तिघे ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Latest Marathi News Live Update : जळगाव जिल्ह्यात मुसळधार! मुक्ताईनगर, भुसावळ, रावेरसह अनेक भागांत जोरदार हजेरी; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Koyna Dam Water Release : कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडले! मोसमातील पहिलाच विसर्ग; धरणात 86.11 टीएमसी साठा, 25 हजार क्युसेकने पाण्याची आवक

SCROLL FOR NEXT