Former MLAs Shirish Kumar Kotwal, Saadhan Jamdar, Nandu Kotwal, Sanjay Jadhav, Deepanshu Jadhav etc. while presenting Vitthal's portrait to Rahul Gandhi in Chandwad. esakal
नाशिक

Bharat Jodo Nyay Yatra: राजकीय चिखलफेकीसाठी विठू माऊलीचा वापर! राहुल गांधींच्या सभेतील 'त्या' व्हिडिओचे चुकीचे दाखले

Political News : विठ्ठलाची प्रतिमा देतानाचा व्हिडीओ अर्धवटरित्या सोशल मीडियावर व्हायरल करीत राहुल गांधीकडून हिंदू देवतांचा कसा अपमान करण्यात आला असे भासविण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

गणूर (चांदवड) : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (ता.१४) चांदवडला हजारो शेतकऱ्यांशी संवाद साधला. या सभेत राहुल गांधींचा स्थानिक काँग्रेसकडून विठू माऊलीची प्रतिमा, बैलगाडी देऊन सत्कार करण्यात आला. मात्र विठ्ठलाची प्रतिमा देतानाचा व्हिडीओ अर्धवटरित्या सोशल मीडियावर व्हायरल करीत राहुल गांधीकडून हिंदू देवतांचा कसा अपमान करण्यात आला असे भासविण्यात आले.

प्रत्यक्षात गांधींनी विठ्ठलाच्या प्रतिमेचा सन्मानपूर्वक स्वीकार केला असताना राजकीय चिखलफेकीसाठी विठू माऊलीचा वापर करण्यात आल्याने वारकरी मंडळींकडून खंत व्यक्त करण्यात येत आहे. (nashik political fake video of Rahul Gandhi rally Bharat Jodo Nyay Yatra marathi news)

राहुल गांधी व्यासपीठावर असताना माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, काँग्रेस तालुका अध्यक्ष संजय जाधव, समाधान जामदार, नंदू कोतवाल, दीपांशू जाधव आदी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी राहुल गांधी यांना फेटा बांधण्यात आला.

फेटा बांधणाऱ्या व्यक्तीकडून राहुल गांधी यांच्या समवेत फोटो काढण्यात येत होता. त्याचवेळी समाधान जामदार हे विठ्ठलाची प्रतिमा देण्याचा प्रयत्न करीत होते मात्र दोन्ही गोष्टी एकाच वेळी झाल्याने फेटा बांधणाऱ्या व्यक्तीकडून विठ्ठलाची प्रतिमा दोनदा मागे सरकविण्यात आली.

अर्थात त्या व्यक्तीनेदेखील ती प्रतिमा कशाची आहे हे नेमके बघितलेले नव्हते. त्यानंतर कोतवाल यांनी विठ्ठलाची प्रतिमा राहुल गांधी यांना सन्मानाने भेट दिली. मात्र सोशल मीडियात अर्धवट व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल करण्यात आला. त्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांना आपल्या सोशल मीडियावर मूळ व्हिडिओ प्रसारित करीत सत्य परिस्थिती समोर आणावी लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT