Officials felicitating the ten Center Pramukhs newly received by the taluka.
Officials felicitating the ten Center Pramukhs newly received by the taluka. esakal
नाशिक

Nashik Teacher Transfer: पोर्टलने दिले 36 अन बदलीने नेले 31 गुरुजी! येवल्यात प्राथमिक शिक्षण वाऱ्यावरच; तब्बल 190 पदे रिक्तच

संतोष विंचू

येवला : एक दोन नव्हे तर तब्बल १५ ते २० वर्षांपासून येथील शिक्षण विभागाला रिक्त जागांची साडेसाती लागली आहे. नुकत्याच झालेल्या पवित्र पोर्टलच्या भरती प्रकियेत तालुक्याला ३६ गुरुजी मिळाले खरे पण हा आनंद क्षणिक ठरला. त्यानंतर लगेचच ३१ गुरुजी जिल्हा बदलाने निघून गेल्याने रिक्त पदांचे घोंगडे असेच भिजत पडले आहे. यामुळे अध्यापनाला मर्यादा येत असून गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने पालक संताप व्यक्त करत आहेत. (Nashik Yeola primary education in trouble 190 posts vacant marathi news)

जिल्हा परिषद शाळांना मागील २० वर्षांपासून पुरेसे शिक्षक देणे अशक्य झाले आहे. सलग अनेक वर्ष पदे रिक्त असल्याने अनेक पालक मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांत पाठवत आहेत. अनेक चार-तीन शिक्षकी शाळा एक-दोन शिक्षकांवर सुरु आहेत. तर कुठे पाच-सहा शिक्षकांची गरज असताना तीन ते चार जण कार्यरत आहेत.

गंभीर म्हणजे ३५ शाळांना मुख्याध्यापकच नसून शिक्षकांनाच ही भूमिका पार पाडावी लागते. या रिक्त जागा भरण्यासाठी गेल्या काही वर्षांत ५० वर शाळांना पालकांनी कुलूप ठोकण्याचे प्रकार घडले, पण याचा कोणताही उपयोग होत नाही. जेथे जागा रिक्त आहे तेथे कामकाज विस्कळित होत आहे. एकीकडे गुणवत्ता ढासळताना शैक्षणिक दर्जा उंचावा, यासाठी पदे रिक्त ठेवणे गैर असूनही नियमांची पायमल्ली केली जात आहे.

आले अन गेलेही!

तालुक्यातील १० उर्दू माध्यमाच्या तर २२६ मराठी माध्यमाच्या २३६ शाळा आहेत. यात प्राथमिकच्या (१ ते ५ वी) १७६ तर उच्च प्राथमिकच्या (१ ते ७ वी) ६० शाळा आहेत. यातील काही शाळांत पोर्टलच्या भरती प्रक्रियेतून २८ प्राथमिक शिक्षक तर ८ पदवीधर असे ३६ गुरुजी हजर झाले.

मात्र याचा आनंद क्षणिक ठरला असून गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेले ३१ जण नगर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, सोलापूर या जिल्ह्यात बदलून गेले आहेत. त्यामुळे आता प्राथमिकला ६८ तर उच्च प्राथमिकला ७५ अशा १४३ शिक्षकांची आजही गरज आहे. संपूर्ण शिक्षण विभागात शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षक असे सर्व मिळून १९० पदे रिक्त आहेत.

फक्त दोनच विस्तार अधिकारी

तालुक्याला शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची ६ पदे मंजूर आहेत. मात्र अनेक वर्षांपासून फक्त दोनच अधिकारी कार्यरत असून ४ पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजाला मर्यादा येत आहेत. (latest marathi news)

केंद्रप्रमुखपदी भूमिपुत्रांना संधी

तालुक्यासाठी केंद्रप्रमुख पदाच्या १८ जागा मंजूर आहेत. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून या जागाही रिक्त होत्या. योगायोगाने आत्ता सेवाज्येष्ठतेनुसार तालुक्यातील दहा मुख्याध्यापकांना बढती मिळाल्याने प्रशासकीय कामाला हातभार लागणार आहे. विशेष म्हणजे या १० जागांवरही तालुक्यातील भूमिपुत्रांना संधी मिळाली आहे.

यात सोमठाण देश केंद्राला शशिकांत पानगव्हाणे, नागडे- रमेश उगले, पाटोदा- राजेंद्र कुशारे, बोकटे- काशिनाथ वाणी, चिचोंडी- चंद्रशेखर दंडगव्हाळ, सायगाव-अरुण खरोटे, अंदरसूल-नारायण डोखे, देशमाने- बाबासाहेब ठाकरे तसेच विजय गायकवाड (भालूर) यांची नेमणूक झाली आहे. तरीही ८ पदे अद्याप रिक्तच आहेत.

असे आहेत मंजूर रिक्त पदे...

पद - मंजूर पदे - कार्यरत पदे - रिक्त पदे

विस्तार अधिकारी - ६ - २ -४

केंद्रप्रमुख - १८ - १० - ८

मुख्याध्यापक - ५० - १५ - ३५

शिक्षक - ६६८ - ६०० - ६८

पदवीधर शिक्षक - १२८ - ५३ - ७५

"सेवा ज्येष्ठतेनुसार बदलीस पात्र कर्मचारी बदलून गेले आहेत तर पोर्टलमधूनही ३६ शिक्षक मिळाले आहेत. रिक्त पदांची माहिती वरिष्ठांकडे पाठवलेली आहे. अजून शिक्षक मिळवण्यासाठी प्रयत्न होत आहेत."- संजय कुसाळकर, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, येवला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT