Coach Nikhil Shinde with his girlfriend celebrating by picking up Pratima Tupe. esakal
नाशिक

Nashik Police Recruitment : खाकी वर्दीसाठी झटणाऱ्या युवतींचे परिश्रम फळाला!

Nashik News : गामने मैदानावर खाकी वर्दीसाठी घाम गाळणाऱ्या युवतींना शनिवारी मीरा भाईंदर पोलिस दलात निवड झालेल्या प्रतिमा तुपेच्या रूपाने पहिले यश मिळाले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : प्रभाग ३१ मधील वासननगर येथील साडेसात एकर जागेवर असलेल्या गामने मैदानावर खाकी वर्दीसाठी घाम गाळणाऱ्या युवतींना शनिवारी (ता. १३) मीरा भाईंदर पोलिस दलात निवड झालेल्या प्रतिमा तुपेच्या रूपाने पहिले यश मिळाले. या साऱ्या जणींनी गुलाल उधळत आणि मिठाई वाटत हा आनंद साजरा केला. (Nashik Police Recruitment)

९ जुलैला ‘सकाळ’ ने या युवतींच्या मेहनतीबाबत जिद्दीने फिटनेसचा सराव या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली होती. दररोज सायंकाळी सुमारे दोन तास घाम गाळणाऱ्या या १५ ते १६ युवती येथे व्यायामासाठी येणाऱ्या शेकडो नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यांच्या या कसून सरावाने इतर युवती, महिला आणि युवकांना देखील आता व्यायामाची प्रेरणा मिळाली आहे.

शनिवारी सकाळी प्रतिमाच्या यशाची बातमी आली आणि या साऱ्या मैत्रिणींनी एकच जल्लोष केला. सायंकाळी सरावानंतर त्याचे जंगी सेलिब्रेशन करण्यात आले. प्रशिक्षक निखिल शिंदे यांच्या हस्ते प्रतिमाचा सत्कार करण्यात आला. (latest marathi news)

तिची बहीण सुप्रियादेखील नेव्हीत आहे. वडील बहिरू आणि आई ललिता तुपे यांचे स्वप्न पूर्ण केल्याचे तिने सांगितले. या वेळी शिवानी बोंबलवाड, सोनाली देवरे, सृष्टी डोंगरे, आकांक्षा दवंडे, पौर्णिमा खिल्लारे, अंजली बोराडे, ऋतुजा उगले, कांचन वाघ, तेजल नागरे, प्रतिमा तुपे, प्रांजल निकुंभ, मनीषा डुकळे, दीपा लांडे, नेहा पाटील.

पूनम, कावेरी, विशाल घुगे, सूरज यलमामे, अजित चव्हाण, संजय आव्हाड, निखिल शिंदे, अजय सांगळे, सागर काळे, समर्थ शिंदे, गौरव बेलदार, बलदेव राजपूत, राहुल भगत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT