While welcoming Principal Secretary V. Radha and officials, Mirabai Jadhav, Dr. Nanasaheb Patil etc. esakal
नाशिक

Nashik Agriculture News : क्रॉपकव्हरद्वारे वाढलेल्या रेडग्लोब द्राक्षबागेला प्रधान सचिवांनी भेट

Nashik News : क्रॉपकव्हरमध्ये वाढविलेल्या रेडग्लोब द्राक्षांच्या बागेला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती व्ही. राधा, कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी भेट दिली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील महिला शेतकरी श्रीमती मीराबाई श्रीपत जाधव यांच्या क्रॉपकव्हरमध्ये वाढविलेल्या रेडग्लोब द्राक्षांच्या बागेला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती व्ही. राधा, कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे, उपसचिव प्रतिभा पाटील, नाशिक विभागाचे कृषी अधिकारी यांनी भेट दिली. (Principal Secretary visits Red Globe vineyard grown through crop cover)

या आधुनिक तंत्रज्ञानाने बहरलेल्या द्राक्षबागेला त्यांनी भेट देऊन अभ्यास दौरा करीत पाहणी केली. या वेळी भर पाऊस पडत असतानाही हा अभ्यास दौरा विशेष फायदेशीर ठरला. क्रॉपकव्हरचे विविध फायदे समजावून घेतले. या वेळी श्रीमती राधा यांनी द्राक्षबागेसाठी क्रॉपकव्हरचा किती खर्च येतो, क्रॉपकव्हरचे मटेरियल ते बांधणीसाठी लागणाऱ्या स्ट्रक्चरसंदर्भातील सर्व बाबी जाणून घेतल्या.

तसेच, क्रॉपकव्हर वापरल्यास पेस्टीसाईडच्या वापरात काय फायदा होतो? गेल्याच वर्षांत दोन वेळेस क्रॉपकव्हरच्या वापरामुळे पडलेल्या गारांपासून द्राक्षपिकाचे कसे संरक्षण झाले, ते जाणून घेतले. क्रॉपकव्हरमुळे उन्हाळ्यात द्राक्ष पिकाचा अति तापमानात कसा फायदा होतो, हेही माहिती करून घेतले. (latest marathi news)

क्रॉपकव्हर वापरल्यास दर्जेदार द्राक्ष उत्पादन कसे होईल, याची बारकाईने माहिती घेतली. याचबरोबर क्रॉपकव्हरचे तोटे व त्याचा उपयुक्त कालावधी यांचाही सखोल आढावा घेतला. तसेच, या संदर्भातील अनुदान योजनांचा उपस्थित अधिकारी वर्गाकडून आढावा घेण्यात आला.

नवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बांधावर येत कृषी विभागाच्या प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिल्याने निश्चितच नवी ऊर्जा मिळाली. नवीन प्रयोग केल्याबद्दल मोहाडी (ता. दिंडोरी) येथील महिला शेतकरी श्रीमती मीराबाई श्रीपत जाधव-पाटील यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Municipality: एससी-एसटींसाठी नवे प्रभाग! महापालिकेसाठी फेररचना; जुन्या राखीव वॉर्डांमध्ये बदल

'हे असला फालतूपणा' जान्हवी जयंतपासून स्वत:ची सुटका करुन घेणार, लक्ष्मी निवासचा प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले...'संपवण्यापेक्षा...'

Latest Marathi News Live Update: कृषी उत्पन्न बाजार समितीममध्ये लसणाची आवक घटल्याने दरामध्ये वाढ होण्यास सुरुवात

ICC Womens World Cup : ३३० धावा करूनही हरल्या, स्पर्धेबाहेर जाण्याचे संकट... कर्णधार हरमनप्रीत कौरने कोणावर फोडले खापर?

Sangli News: कवलापूरला विमानतळ करा; मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पृथ्वीराज पाटील यांच्याकडून साकडे

SCROLL FOR NEXT