water tanker  sakal
नाशिक

Nashik ZP News : टँकरच्या पाण्याची शुद्धता तपासण्यात यावी; जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांचे निर्देश

Nashik News : ग्रामीण भागात टॅंकरने पाणीपुरवठा करताना त्यांची शुद्धता तपासण्यात यावी, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गंभीर होत आहे. टँकर मागणीचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर गटविकास अधिकारी यांनी स्वतः तहसीलदार, प्रांत यांच्यांशी चर्चा करावी. ग्रामीण भागात टॅंकरने पाणीपुरवठा करताना त्यांची शुद्धता तपासण्यात यावी, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले. (Purity of tanker water should be checked)

टँकरद्वारे अशुद्ध पाणीपुरवठा होता कामा नये, अशी ताकीदही त्यांनी या वेळी दिली. लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक आणि दिंडोरीचे मतदान आटोपल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील टंचाईकडे लक्ष केंद्रित केले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी बुधवारी (ता. २२) विभागप्रमुख, गटविकास अधिकारी यांची आढावा बैठक घेतली.

बैठकीत प्रामुख्याने ग्रामपंचायतअंतर्गत १५ व्या वित्त आयोगाचा खर्च, घरकुल योजना, मिशन आत्मनिर्भर, नरेगा यांचा आढावा मित्तल यांनी घेतला. १५ व्या वित्त आयोग निधी खर्चात मोठ्या ग्रामपंचायतींत काही अडचणी येत आहे का, याची पाहणी करावी. त्या ग्रामपंचायतींना भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करावी अन् निधी वेळात खर्च करण्याचे आदेश मित्तल यांनी या वेळी दिले.

घरकुल योजनेंतर्गत अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करावे, घरकुल हप्त्यांबाबत काही तक्रारी असल्यास त्यांचे निराकरण करावे, अशा सूचनाही त्यांनी याप्रसंगी दिल्या. बैठकीच्या अखेरच्या टप्प्यात टंचाईचा आढावा झाला. सुरू असलेले टॅंकर, प्रस्ताव याची माहिती मित्तल यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडून घेतली. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने ग्रामीण भागात टॅंकरची मागणी वाढत आहे. (latest marathi news)

मागणी प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर गटविकास अधिकारी यांनी लागलीच खात्री करून घ्यावी, पाहणी अहवाल तत्काळ द्यावा. टॅंकर प्रस्ताव लवकर मंजूर व्हावा, यासाठी संबंधित तहसीलदार, प्रांत यांच्याशी चर्चा करावी. टॅंकर मंजूर झाल्यानंतर त्याद्वारे शुद्ध पाणीपुरवठा होत आहे की नाही, याची शहानिशादेखील गटविकास अधिकारी यांनी करावी.

त्यासाठी पाण्याची प्रयोगशाळेतून पडताळणी करून घ्यावी. टॅंकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा होईल, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना मित्तल यांनी या वेळी दिल्या. बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, पाणी व स्वच्छता विभागाचे दीपक पाटील, नरेगाचे नयन पाटील, शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dairy Controversy : मग कोरमचा कायदाच का रद्द करत नाही? सतेज पाटील यांचा CM फडणवीसांना प्रतिप्रश्न

Palghar Talasari Earthquake Tremors : पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सत्र पुन्हा सुरू; तलासरीत २.८ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा धक्का, ३१ ऑक्टोबरनंतर पुन्हा भूकंपाने हादरला परिसर

Ashti Tiger Attack Farmer Death Beed News : आष्टी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार; देवळाली परिसरासह तालुक्यात प्रचंड घबराट, सकाळी १० ते ५ या वेळेतच शेतात जाण्याचे वनविभागाचे आवाहन

SIR Controversy: कितीही अटक करा, देशभरात तिरंगा फडकावतच राहणार! अभिजीत दिपकेंचा कोचीत एल्गार

यंदाची दिवाळीही सीमेवरील जवानांसोबत! पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT