Sarada Circle Chowk decorated as Rahul Gandhi arrives in Nashik for Bharat Jodo Yatra. esakal
नाशिक

Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी प्रथमच शहरात

Nashik Rahul Gandhi : भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने खासदार राहुल गांधी यांचे गुरुवारी (ता. १४) नाशिक शहरात दुपारी आगमन होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने खासदार राहुल गांधी यांचे गुरुवारी (ता. १४) नाशिक शहरात दुपारी आगमन होत आहे. द्वारका येथून शालीमार चौकापर्यंत रोड शो आणि तेथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तेथे चौकसभा होणार आहे. त्यांच्या स्वागतासह सुरक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत या भागातील रस्ते स्वच्छ केले जात होते. (Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra Rahul Gandhi in city marathi news)

अडथळा ठरू शकतील असे बॅनर हटविले. रोड शोवरील मार्गावर पोलिसांनी सायंकाळी वाहनासह रुटमार्च काढला. खासदार राहुल गांधी बुधवारी सकाळी नाशिक जिल्ह्यात दाखल झाले. बुधवारी त्यांचे मालेगाव येथे आगमन झाले. गुरुवारी सकाळी ८ वाजता चांदवड येथे शेतकरी मेळाव्यानंतर वणी शिरवाडे फाट्याजवळून पिंपळगाव बसवंत येथे रोड शो करतील. दुपारी अडीच वाजता यात्रेचे नाशिकमध्ये आगमन होईल.

द्वारका चौकातून ही यात्रा शालीमार चौकात दाखल होईल. येथील स्व. इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ४ वाजता चौकसभा घेण्यात येईल. तेथून समोरील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. तेथून ते सातपूर मार्गे सायंकाळी त्र्यंबकेश्वरला रवाना होऊन दर्शन घेतील तेथे, आदिवासी मेळावा घेऊन तेथून जव्हार मार्गे रवाना होतील. या रोड शो, चौकसभेची जोरदार तयारी सुरू होती. (latest marathi news)

सायंकाळी स्व. इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याची साफसफाई करण्यात आली. राहुल गांधी हे चांदवड येथे गुरुवारी सकाळी ८ वाजता चांदवड चौफुली येथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यासाठी कांदा व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. या मेळाव्याला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत उपस्थितीत राहणार आहे.

जनतेमध्ये उत्साह, ठिकठिकाणी होणार स्वागत

खासदार राहुल गांधी शहरात प्रथमच येत आहेत. त्यांच्या स्वागताची शहरात जय्यत तयारी झाली आहे. राहुल गांधी यांचे द्वारका, सारडा सर्कल, गंजमाळ सिग्नल, शालीमार चौकात येथे स्वागत होणार आहे. या ठिकाणी स्वागताची जय्यत तयारी झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी काँग्रेस पक्षाचे झेंडे आणि स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. संपूर्ण शहरात पक्षाकडून होर्डिंग लावण्यात आले आहेत. तसेच जागोजागी त्यांचे स्वागताचे फलक पदाधिकाऱ्यांनी लावत शक्तीप्रदर्शन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Dhule Traffic : धुळे वाहतूक कोंडी सुटली! गडकरींच्या निर्देशानंतर फागणे-धुळे वळण रस्त्याची एक बाजू १५ ऑक्टोबरपर्यंत खुली होणार

District Judge Dismissed: माेठी बातमी!'सातारा जिल्हा न्यायाधीश बडतर्फ'; तीन ऑक्टोबरपासून पदमुक्त, नेमकं काय कारण?

Irani Cup 2025: विदर्भाने पटकावला विजेतेपदाचा मान; इशान किशन, पाटिदार, ऋतुराजसारखे स्टार खेळाडू असलेल्या संघाला केलं पराभूत

SCROLL FOR NEXT