रेल्वेस्थानक sakal
नाशिक

रेल्वेस्थानकावर ‘आओ जाओ घर तुम्हारा’; प्रवाशांना विनातपासणी मिशतोय शहरात प्रवेश

परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करणे रेल्वेस्थानकावर बंधनकारक आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : नाशिक शहरात सध्या ओमिक्रोन (nashik corona update)आणि कोरोना रुग्ण(covid patients) संख्या वाढत आहे. अशातच परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची रेल्वेस्थानकावर तपासणी न करताच शेकडोंच्या संख्येने प्रवासी रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडत आहेत. रेल्वे स्थानकाबाहेर व आत जाण्यासाठी सध्या दोन मार्ग असल्यामुळे दुसऱ्या मार्गाने परराज्यातून येणारे प्रवासी नाशिक शहरात प्रवेश करत आहेत. यामुळे रेल्वे स्थानकावर ‘आओ जाओ घर तुम्हारा’, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाचे मात्र या गंभीर गोष्टीकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे.

सध्या राज्यातल्या राज्यात तपासणी बंधनकारक केलेली नसली तरी परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करणे रेल्वेस्थानकावर बंधनकारक आहेत. सध्या रेल्वे स्थानकाबाहेर व आत जाण्यासाठी दोन गेट केले आहे. याआधी केवळ एकाच गेटने एन्ट्री व एक्झिट होती. मात्र, रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांसह काही लोकप्रतिनिधींनी दुसरे गेट खोलण्याची विनंती स्टेशन मास्तर आर. के. कुठार यांना केली. त्याप्रमाणे कुठार यांनी गेट उघडले. मात्र, आता या

दुसऱ्या गेटने परराज्यातील शेकडो प्रवासी रोज विनातपासणी रेल्वे स्टेशन बाहेर येत आहे. या गंभीर गोष्टीचे महापालिकेला अजिबात गांभीर्य नाही. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची संख्या आधीच कमी आहे. त्यात दुसऱ्या मार्गे हजारोंच्या संख्येने प्रवासी रेल्वे स्थानकाबाहेर विनातपासणी येत आहे. यातून मोठ्या प्रमाणावर आजार फोफावण्याची भीती निर्माण झालेली आहे.

नाशिक रोड रेल्वे स्थानकाच्या दोन्ही गेटवर महापालिकेने तपासणी पथके नेमायला हवी. प्रवाशांना लांबून वळसा घालून जावे लागत होते. यामुळे दुसरे गेट खोलणे आवश्यक होते.

- राजेश फोकणे, रेल्वे सल्लागार समिती

लोकप्रतिनिधी व रेल्वे सल्लागार समितीच्या लोकांनी विनंती केल्यानुसार दुसरे गेट करण्यात आले आहे. मात्र, या गेटमधून अनेक विनातिकीट प्रवासी व विनातपासणी न करताच प्रवासी बाहेर पडत आहे. प्रशासनाने यावर तोडगा काढायला हवा.

- आर. के. कुठार, स्टेशन मास्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight Crisis : इंडिगोची आजही ४५० उड्डाणे रद्द, भारताच्या हवाई इतिहासातील सर्वात मोठे संकट कधी संपणार ?

Wani Accident : भीषण अपघात: वणी गडावरील भवरीनाला येथे इनोव्हा ९०० फूट दरीत कोसळली; सहा भाविक जागीच ठार, घाट सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

भारतात होणाऱ्या T20 World Cup 2026 पूर्वी आयसीसीसमोर उभं राहिलं संकट; चाहत्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

Nagpur News : ‘इंडिगो’ने आमदार, मंत्र्यांना आणले ‘जमिनी’वर; अधिवेशनासाठी अनेकांचा रस्त्याने प्रवास

Video : शापित विमानतळ! तीन वर्षात पडलं बंद, आता पक्षीही फिरकत नाही; काय आहे रहस्य?

SCROLL FOR NEXT