A tractor carrying sugarcane straw to feed the animals esakal
नाशिक

Nashik Rain Crisis: पाऊस न झाल्याने भीषण चाराटंचाई! निफाड तालुक्यातील ऊसाला वाढली मागणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain Crisis : पावसाचे जवळपास तीन महिने संपले असून, अद्याप नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्याने अनेक तालुक्यांमध्ये खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पशुपालकांनी साठवून ठेवलेला कोरडा चारा संपला आहे.

जिल्ह्यातील अनेक भागांत घास व गवत भरण्यासाठी पाणी न राहिल्याने निफाड तालुक्यातून चाऱ्यासाठी ऊसाला मागणी वाढली आहे. (Nashik Rain Crisis Scarcity of fodder due to lack of rain Increased demand for sugarcane in Niphad taluka)

नाशिक जिल्ह्यातही जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी खरीप हंगामातील मका, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिके पावसाअभावी करपू लागली आहेत. अनेक ठिकाणी मनुष्य व जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही.

जिल्ह्यात भीषण चाराटंचाई निर्माण झाली आहे. येवला, चांदवड, मनमाड, सिन्नर आदी ठिकाणचे पशुपालक चाऱ्यासाठी निफाड तालुक्यातून ऊस घेऊन जात आहेत. साधारणपणे चार हजार ते सहा हजार रुपये गुंठ्याप्रमाणे ऊस विकला जात आहे.

दररोज तालुक्यातून शंभरच्या आसपास ट्रॅक्टर भरून जात आहेत. पशुपालकांकडील साठवून ठेवलेला कोरडा चारा संपला असून, हिरवा चारा म्हणून लागवड केलेले गवत, घास, मका, खोंडे आदींना भरण्यासाठी पाणी नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अनेक ठिकाणी पिण्यासाठी पाणी नसल्याने दुग्ध उत्पादनावरही या दुष्काळाचा परिणाम भविष्यात दिसून येणार आहे.

त्याचप्रमाणे अजून काही काळ वेळेवर पाऊस न झाल्यास तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर ऊसाची विक्री होईल व गाळपासाठी कारखान्यांना ऊस मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

"जूनमध्ये पाऊस न झाल्याने जनावरांच्या चाऱ्यासाठी मका, गवत, खोडे आदीची पेरणी करता आली नाही. त्यामुळे चाराटंचाई निर्माण झाली आहे. हिरवा चारा म्हणून लागवड केलेले गवत, घास पाण्याअभावी वाळले आहे. त्यामुळे निफाड तालुक्यातील ऊस विकत आणून पशुधन जगविण्याचा प्रयत्न सुरू आहे."

-पोपट काळे, पशुपालक, रेडगाव

"पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले, तरी जोरदार पाऊस झालेला नाही. दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खरिपातील पिके पूर्णतः वाया गेली असून, पाऊस झाला तरी खरीप पिकाना फायदा होणार नाही. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून खरिपातील पीक विम्याची रक्कम देणे सुरू करावे. पशुधनाच्या संख्येनुसार शेतकऱ्याला चारा उपलब्ध करून द्यावा." -राजेंद्र बोरगुडे, संचालक, बाजार समिती, लासलगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election Voting: १५ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, मतदानाच्या दिवशी रजा नाकारणाऱ्या आस्थापनांवर कारवाई

Baba Vanga Predictions 2026: जग मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर? माणसांची निर्णयक्षमता हरवणार, पृथ्वीवर परग्रहवासी येण्याचा दावा

Latest Marathi News Live Update : पुण्यात आज अजित पवारांचा रोड शो

Aluminum Foil किंवा Container मध्ये अन्न ठेवता? जीवावर बेतेल; तज्ज्ञांचा धक्कादायक इशारा

IND vs NZ, 1st ODI: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताच्या संघात ६ गोलंदाजांची निवड, पाहा प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT