Rain
Rain sakal
नाशिक

Nashik Rain: नाशिकला पावसाने झोडपले; एका तासात 27 मिमी पावसाची नोंद

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : मागच्या काही दिवसांपासून थांबलेल्या पावसाने नाशिकला रात्री अक्षरश: झोडपून काढलं आहे. त्यामुळे एका तासात नाशिकमध्ये २७ मिमी पावसाची विक्रमी नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर आज हवामान विभागाने काही भागात रेड अलर्ट तर काही भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मागच्या आठवड्यापासून तोंड दडून बसलेला पाऊस आता पुन्हा बरसणार आहे.

(Nashik Rain Updates)

काल नाशिकमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण होतं पण सायंकाळी शहरातील विविध ठिकाणी जोरदार पासाला सुरूवात झाली होती. शहरातील गंगापूर रोड, मुंबई नाका, पाथर्डी फाटा अशा ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने एका तासातच २७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर आजही नाशिकमध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत.

आज दक्षिण कोकणात जोरदार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. गेल्या दहा ते १२ दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने आता पुन्हा जोर धरला आहे.

हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यासह कोल्हापूर, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Firecracker Factory Blast: शिवकाशीतल्या फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट; 8 जणांचा मृत्यू

Bajrang Punia: बजरंग पुनिया निलंबन प्रकरणाला नवं वळण; भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून परदेशात ट्रेनिंगसाठी निधी मंजूर, मात्र...

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी सांताक्रूझ आणि गोरेगावमध्ये वाहतूक बदल

Moon Express: चंद्राबाबत मोठी बातमी! मून एक्स्प्रेसची तयारी सुरू, नासा चालवणार ट्रेन

PBKS vs RCB Live Score : आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघ लावणार जोर

SCROLL FOR NEXT