Heavy rain file photo esakal
नाशिक

Nashik Rain Update: मालेगावात दमदार पावसाची हजेरी! रब्बीच्या आशा पल्लवित

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain Update : शहर व तालुक्यात आज दुपारनंतर दमदार पावसाने हजेरी लावली. मंगळवारी सायंकाळी पाचनंतर झालेल्या जोरदार पावसाने शहरातील झोपडपट्टीसह सखल भागात पाणी साचले.

पावसाच्या पाण्याने गटारी तुडूंब भरून वाहत होत्या. दरम्यान ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.

सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात झालेल्या या पावसाने दुष्काळी परिस्थिती दूर होण्यास मदत होणार आहे. पिण्याचे पाणी व चाऱ्याचा प्रश्‍न सुटू शकेल. पावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडीत झाला होता.

शहरासह कसमादेत गेल्या आठवड्यापासून पाऊस रोज हजेरी लावत आहे. मंगलमूर्तींच्या आगमनाबरोबरच पाऊस सुरू झाल्याने गणेशभक्तांसह नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

गेल्या पाच दिवसात सर्वत्र ३० ते ५० मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यासह सर्वच घटकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. भीज पावसामुळे अनेक भागात विहिरींना पाणी उतरण्यास सुरुवात झाली आहे.

समाधानकारक वातावरण आहे. पोळ व रांगडा कांद्याची लागवड वाढली आहे. भाजीपाला लागवड सुरू झाली आहे.

पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला. पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. गेल्या आठवड्याभरापासून कसमादे पट्ट्यात होत असलेल्या पावसाने पाणी व चाऱ्याचा प्रश्न सुटू शकेल.

ग्रामीण भागात बहुतांशी ठिकाणी प्रथमच मोठा पाऊस झाला. नदी, नाल्यांना पूर आल्याने पाणीपुरवठा योजनांचे जलसाठे भरले आहेत. ग्रामीण भागात शेतमजुरांना काम मिळू लागले आहे. पावसामुळे शेतीच्या कामांना पुन्हा वेग येणार आहे.

गेल्या तीन महिन्यापासून कसमादे परिसरात पावसाने ओढ दिल्याने नैराश्‍याचे वातावरण होते. पावसामुळे ग्रामीण अर्थ व्यवस्थेची चाके पुन्हा फिरू लागली आहेत.

डाळिंबासह इतर फळ पिकांना पाऊस फायदेशीर ठरत आहे. परतीचे आणखी दोन तीन मोठे पाऊस झाल्यास पाणी टंचाईचा प्रश्न निकाली निघू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे! राहुल गांधींचा मोर्चाआधी मोठा इशारा, 'एसआयआर' मधील खरे गुन्हेगार दुसरेच..

IND vs NZ : भारतीय संघाला धक्का, स्टार फलंदाजाने लंगडत मैदान सोडले; न्यूझीलंड दौऱ्यासाठी उद्या होणार होता रवाना, पण...

Ladki Bahin Yojana Payment Update : ...तर खात्यात जमा होणार एकत्र 3000 रुपये? लाडकी बहीण योजनेच्या नव्या अपडेटने वाढवली उत्सुकता, नवरात्रीत लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?

नवरात्रीच्या उत्सवाला गालबोट! देवीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून निघाल्या, वाटेतच टँकरने उडवलं; ४ वर्षीय चिमुकलीसह मायलेकीचा दुर्दैवी अंत

OnePlus 16 स्मार्टफोन होणार लाँच! 9000mAh बॅटरीसह 185FPS गेमिंग सपोर्ट; जाणून घ्या दमदार फीचर्स...

SCROLL FOR NEXT