Due to heavy rain in the city on Friday evening, devotees who came to see Lord Ganesha were in a frenzy. esakal
नाशिक

Nashik Rain Update: शहरात पावसाची दमदार हजेरी! गणेशभक्तांचा हिरमोड; पुढील 2 दिवस गर्दीची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

: गणेशोत्सवात मॉन्सूनमध्ये पहिल्यादांच शहरात शुक्रवारी (ता. २२) साधारण दोन तासांच्यावर जोरदार सरी कोसळल्या. सायंकाळनंतर पडलेल्या पावसाने एकीकडे शहरवासीयांना दिलासा मिळाला असताना दुसरीकडे गणेश भक्तांचा मात्र हिरमोड झाला.

शहरात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. श्रावणात पावसाने दडी दिल्यानंतर गणेशोत्सवात बाप्पासह पावसाचे झालेले आगमन शहरवासीयांना सुखावणारे आहे. (Nashik Rain Update Strong presence of rain in city Chance of congestion for next 2 days for ganesha decoration)

दुपारनंतर ढग दाटून आल्यानंतर पावणेसहानंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नाशिककरांनी देखावे पाहण्यासाठी केलेले प्लॅन रद्द करावे लागले, तर काही गणेशभक्तांनी छत्री, रेनकोटचा आधार घेत बाप्पाचे दर्शन, पावसात देखावे पाहण्याचा आनंद घेतला.

पावसामुळे रविवार कारंजा मित्रमंडळ, अशोक स्तंभ मित्र मंडळ, सरदार चौक, मुंबई नाका युवक मित्रमंडळ, बी. डी. भालेकर मैदानावरील मंडळ, कॉलेज रोड, गंगापूर रोडवरील सार्वजनिक मित्रमंडळासह उपनगरांमधील गणेशोत्सव मित्र मंडळांचे देखावे पाहण्यासाठी दररोज होणारी गर्दी शुक्रवारी कमी झाली.

पूजा साहित्य विक्री करण्यासाठी आलेल्या विक्रेत्यांचीही मोठी तारांबळ उडाल्याचे दिसले. गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवसापासून बाप्पाचे दर्शन व देखावे पाहण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली आहे.

देखावे पाहण्यासाठी नाशिककरांचा मोठा प्रतिसाद मिळत असताना देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी शुक्रवारी कमी झाल्याचे दिसले.

आज शनिवारी व उद्या रविवारी शहरातील विविध मंडळांनी केलेले देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. आठनंतरही पावसाचा जोर कायम होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT