Nashik Rain Updates Sakal
नाशिक

Nashik Rain Update : जिल्ह्यात सर्वदूर संततधार 'श्रावणसरी'

विनोद बेदरकर

Nashik Rain Updates : शहर जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार श्रावणसरीमुळे समाधान आहे. धरणातील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे. चोवीस तासात २७ मि.मी हून आधिक पावसाची नोंद झाली. पूर्व व पश्चिम अशा दोन्ही भागात संततधारेमुळे धरण साठ्यात वाढ होत आहे.

शहरात मागील महिण्यात मोठी ओढ दिली असून जेमतेम ५४ टक्केच्या आसपास धरणातील पाणीसाठा ५७ टक्के झाला आहे. त्यामुळे केवळ पिण्याच्या पाण्याचा विचार करण्याचा विचार सुरु असतांना दोन दिवसांपासून सुरु असलेल्यां श्रावणसरीनी शहर जिल्ह्याला चांगलाच दिलासा मिळाला आहे. धरणातील पाणीसाठा वाढायला मदत होणार आहे. जिल्ह्यातील धरणात पुरेसा साठा नसल्याने सिंचनाला पाणी देता येईल का, याविषयी चिंता होती. श्रावणसरीचा जोर असाच सुरु राहिल्यास सिंचनाला दिलासा मिळण्याची त्यामुळे आशा निर्माण झाली आहे. हवामान विभागाने पुढील आठवड्यात येत्या शनिवार (ता.२१) पासून पावसाचा अंदाज वर्तविला आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वच्या सर्व पंधरा तालुक्यात पावसाची हजेरी राहिली आहे. त्यामुळे आणखी चार पाच दिवस अशाच श्रावणसरी सुरु राहिल्यास जिल्ह्यातील सर्वच्या सर्व २३ धरणातील साठा वाढायला मदत होणार आहे.

पालखेडमधून विर्सग

पालखेड धरणातून सायंकाळी ४०० क्युसेसने विर्सग सुरु झाला आहे. गंगापूर धऱणात दोन दिवसांत ५ टक्के साठा वाढला. ७५ टक्केच्या पुढे सरासरी पोहोचली आहे. पश्चिम पट्यातील गंगापूर पाणलोट क्षेत्रात संततधार पावसाने

दिलासा दिला तसा पालखेड पाणलोटातील पाणी वाढले जिल्ह्यातील पाणीसाठा दोन दिवसांत सरासरी ३ टक्केच्या आसपास वाढला आहे. ५५ टक्केहून तो ५७ टक्के पर्यत पोहोचला आहे. त्यामुळे दोन दिवसांपासूनच श्रावणसरीचा भीज पाउस पाण्याची पातळी वाढण्यासाठी पूरक ठरतो आहे.

परतीवर भिस्त

पाच वर्षापासून जिल्ह्याला नैऋत्य मोसमी पाउस हुलकावणी देतो आहे. जूनला केरळ किनारपट्टीवरुन येणाऱ्या मोसमी वाऱ्यांपासूनच पाउस हुलकावणी देत असल्याने पाच पैकी चार वर्षे परतीच्या पावसाने तारले आहे. हि नाशिक जिल्ह्यापुढील महत्वाची चिंता आहे. आतापर्यत कायम मोसमी पावसाऐवजी जिल्ह्याला ऑगस्टनंतरच्या तसेच पावसाळा संपण्याच्या दरम्यानच्या परतीच्या पावसाचा दिलासा राहिला आहे. यंदाही जून व जुलै महिण्यात नाशिक जिल्ह्याला मोसमी पावसाने दिलासा दिला नाही. त्यामुळे सध्याच्या श्रावणसरींसोबत परतीच्या पावसावर जिल्ह्यातील २३ धऱणातील पाण्यासाठीची भिस्त अवलंबून आहे.

खरीपाला दिलासा

श्रावणसरीमुळे पश्चिम पट्यातील पावसाळी तालुक्याशिवाय पुर्वेकडील दुष्काळी तालुक्यातही हजेरी लावली आहे. दोन दिवसांपासून सगळ्यात तालुक्यात पाउस सुरु आहे. त्यामुळे काही दिवसांपासून दुबार पेरणीचे संकट घोंगावत असलेल्या नाशिक जिल्ह्यातील खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर सिंचनाच्या आवर्तनाची सोय होणार आहे. आतापर्यत इगतपुरी (७३), पेठ (७०), त्र्यंबकेश्वर (५७), मालेगाव (६४), नांदगाव (५९), बागलाण (५७), सुरगाणा (७०), निफाड (६६), येवला (५६), याप्रमाणे ९ जिल्ह्यात पन्नास टक्केहून आधीक पाउस झाला आहे. त्यात, चार पश्चिम पट्यातील पावसाळी तालुके आहे. एकुणच अजूनही सहा तालुक्यात पावसाची प्रतिक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivshahi Bus: एसटीच्या ‘शिवशाही’ला कायमचा ब्रेक लागणार! आता MSRTC च्या 'या' बसेस रस्त्यावर धावणार; प्रशासनाचा मोठा निर्णय

Who is Auqib Nabi? रणजी स्पर्धेत ५५ विकेट्स घेणारा, वेगाचा नवा बादशाह... दिनेश कार्तिकने केले कौतुक; भारतीय संघात तो हवा...

बिग बॉसची स्पर्धक तन्वी कोलतेला मोठा धक्का, इन्स्टाग्राम अकाऊंट अचानक गायब!

Company Bonus Video: पैसेच पैसे! टेबलावर ठेवले २४० कोटी अन् म्हणाला मोजता येतील, तेवढे उचला

T20 WC, WI vs SA: विंडीजने दाखवली ताकद, शेफर्ड - होल्डरची विश्वविक्रमी भागीदारी अन् द. आफ्रिकेसमोर मोठं लक्ष्य; भारताची धाकधुक वाढली

SCROLL FOR NEXT