Marathi Rajbhasha Din esakal
नाशिक

Marathi Rajbhasha Din Special : ‘अभिजात दर्जा’साठी हवी राजकीय इच्छाशक्ती, काय आहेत निकष?

Marathi Rajbhasha Din : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी कसोशीने काम करणाऱ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया...

सकाळ वृत्तसेवा

Marathi Rajbhasha Din Special : प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा अभिजात समितीने ३१ मे २०१३ ला केंद्र सरकारकडे अंतिम अहवाल सुपूर्द केला. आता केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी राज्य मराठी भाषा विभागाने माजी आयएफएस अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली.

यामध्ये सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांचा समावेश आहे.

तत्पूर्वी अंमळनेर येथे झालेल्या ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी ठराव मांडला. त्या पार्श्वभूमिवर समिती स्थापन करण्यात आली. समित्या स्थापन होतात, अहवाल सादर केले जातात नंतर ते वर्षानुवर्षे धूळखात पडतात.

वर्षानुवर्षे चालत आलेला पायंडा आहे. दशकापासून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याचे घोंगडे भिजत घोंगडे आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी कसोशीने काम करणाऱ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया... (nashik Marathi Rajbhasha Din Special marathi news)

आजवर अभिजात दर्जा मिळालेल्या भाषा

तमीळ : २००४

संस्कृत : २००५

कन्नड : २००८

तेलगू : २००८

मल्याळम : २०१३

ओडिया : २०१४

काय आहेत निकष

-भाषेला दोन ते अडीच हजार वर्षाचा इतिहास असावा

-दुसऱ्या भाषेकडून उसनी भाषा न घेता अस्सल भाषा असावी

-अभिजात दर्जा देण्याचे अधिकार केवळ केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला

-भाषेत प्राचीन साहित्य असायला हवे

दर्जा मिळाल्यानंतरचे बदल

भारतात ११ कोटी लोकांची बोलीभाषा मराठी आहे. कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा मिळणे म्हणजे ती भाषा समृध्द प्राचीन आहे हे निश्चित होते. अभिजात दर्जा मिळालेल्या भाषांच्या विकासासाठी, त्या अधिकाधिक समृध्द व्हाव्यात यासाठी केंद्राकडून प्रत्येक वर्षी करोडो रुपयांचा अनुदान मिळते. त्याचबरोबर भाषा भवन, ग्रंथ व साहित्य प्रसार, ग्रंथालये, देशभरातील विद्यापीठे किंवा अन्य संस्थेमार्फत भाषेचा प्रचार प्रसार होणाऱ्या प्रकल्पांसाठी आर्थिक मदत केली जाते.

"मंत्रालय आणि प्रधानमंत्री कार्यालयाला जी माहिती हवी आहे, ती पुरविणे हा पहिला टप्पा असणार आहे. त्यानंतर सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा तर आहे पण राजकीय दबाव वाढविणे आवश्यक आहे. विविध माध्यमांतून अभिजात दर्जा मिळावा म्हणून अभियान सुरू करणे महत्त्वाचे ठरेल. दिल्लीत साधारण ३००-३५० मराठी अधिकारी आहेत. आमची पुढचे पाऊल नावाची दिल्लीत नोंदणीकृत संस्था आहे. यामार्फत जागृती करणे असे तीन महत्त्वाचे टप्पे असणार आहेत. लोकशाहीत जनतेचा दबावाने बदल घडणे सहज शक्य आहे."

- ज्ञानेश्वर मुळे, माजी सनदी अधिकारी, अध्यक्ष

"समितीचे स्वागतच करतो. ज्ञानेश्वर मुळे आएफएस अधिकारी, राजदूत होते. त्यामुळे ते नक्कीच चांगले काम करतील. परंतु राजकीय निर्णय होण्यासाठी जोपर्यंत सर्वपक्षीय नेते, संसदेचे प्रतिनिधींना याची गरज भासत नाही, तोपर्यंत सर्व कठीणच आहे. पाठपुरावा करण्यासाठी नवीन समिती नेमणे चांगली गोष्ट आहे. आता निर्णय होण्यासाठी कोणकोणते तंत्र वापरावी हा विचार समितीने करावा. त्यासाठी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा."

-प्रा. रंगनाथ पठारे, अध्यक्ष, मराठी भाषा अभिजात समिती

"मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या सर्व निकषांची पुर्तता झाली आहे. केवळ आता केंद्र सरकारतर्फे शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. यासाठी आता का वेळ लागतोय, यावर विचार व्हायला हवा. यासाठी नेमलेल्या समितीने व राज्य शासनाने ही मागणी लावून धरली पाहिजे."

- डॉ. रवींद्र शोभणे, ९७ व्या अ. भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

"मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी शासन दरबारी मोठी अनास्था आहे. शासनाचे सर्व निकष पूर्ण केल्यानंतरही का उशीर होतो आहे, हा प्रश्न महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी प्रखरपणे मांडायला हवा. मराठी भाषेचा पंचवीस वर्षांचा धोरण आराखडादेखील प्रलंबित आहे. त्यावर शासन कुठलाही निर्णय घेत नाही."- प्रकाश होळकर, मराठी भाषा सल्लागार समिती सदस्य

"मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. शासन तथा प्रशासकीय स्तरावर हा विषय कुठे प्रलंबित आहे, याचा अभ्यास करून लवकरच शासनाकडे पाठपुरावा करताना समितीचा आढाव घेणार आहोत."

- लक्ष्मीकांत देशमुख, अध्यक्ष मराठी भाषा सल्लागार समिती

"मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ही मागणी करताना तात्यासाहेबांनी व्यक्त केलेली खंत आजही जिवंत आहे. यासाठी महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेत्यांनी शासन स्तरावर हा विषय मांडायला पाहिजे."- प्रा. रवींद्र कदम, अध्यक्ष, अ. भा. नाट्य परिषद, नाशिक शाखा

"मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, त्याला यश मिळेल. मात्र आपण आपल्या दैनंदिनीत मराठी भाषेचा वापर हा अभिमानाने करायला हवा. त्यासाठी आपल्याला कोणाही रोखलेले नाही." - प्रा. दिलीप फडके, अध्यक्ष, सावाना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

SCROLL FOR NEXT