Eidgah grounds fully equipped for Ramadan Eid prayers. esakal
नाशिक

Ramadan Eid 2024 : ‘चाँद नजर आ गया..’ आज साजरी होणार रमजान ईद

Ramadan Eid 2024 : चाँद नजर आ गया... रोजे रखने वालो की है ईद, ईद मुबारक आयी है ईद’ गीताचा प्रत्यय आणून देणारे वातावरण बुधवारी (ता.१०) सायंकाळी अनुभवावयास मिळाले.

सकाळ वृत्तसेवा

Ramadan Eid 2024 : चाँद नजर आ गया... रोजे रखने वालो की है ईद, ईद मुबारक आयी है ईद’ गीताचा प्रत्यय आणून देणारे वातावरण बुधवारी (ता.१०) सायंकाळी अनुभवावयास मिळाले. सायंकाळी चंद्रदर्शन घडताच चाँद नजर आ गया, ईद मुबारक’ असे म्हणत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. तर दुसरीकडे किरकोळ खरेदीसाठी बाजारात गर्दी उसळलेली दिसून आली. चंद्र दर्शनाकडे मुस्लिम बांधवांच्या नजरा लागू होत्या. (nashik Ramadan Eid will be celebrated today marathi news)

मंगळवारी (ता.९) रमजान महिन्याची उर्दू २९ तारीख असल्याने चंद्रदर्शन घडण्याची शक्यता होती. मात्र तसे झाले नाही. राज्यासह देशात कुठेही चंद्रदर्शन घडले नाही. त्यामुळे मुस्लिम बांधवांना आणखी एक रोजा करण्यास मिळाल्याने त्यांच्यात उत्साहाचे वातावरण होते. बुधवारी (ता.१०) सायंकाळी चंद्रदर्शन घडले. गुरुवारी (ता.११) रोजी रमजान ईद साजरी होणार असल्याची घोषणा चाँद कमिटीचे अध्यक्ष तसेच शहर-ए-खतीब हीसामोद्दीन खतीब यांनी केली.

त्यांच्या अध्यक्षतेत शहरातील मौलवींची शाही मशीद येथे झालेल्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेतला. गुरुवारी सकाळी १० वाजता ईदची नमाज होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यानिमित्त ईदगाह मशीद आणि मैदानाची मुस्लिम बांधव तसेच चाँद कमिटीचे सदस्य यांनी पाहणी केली. तर दुसरीकडे ईदसाठी आवश्यक किरकोळ खरेदीसाठी मुस्लिम बांधवांनी बाजारपेठेत गर्दी केली होती.(latest marathi news)

दूध बाजार ते फाळके रोड, फाळके रोड ते चौक मंडई, बागवान पुरा, वडाळा रोड भागात रात्री उशिरापर्यंत खरेदी-विक्री सुरू होती. दर्गा, मशीद तसेच घरांवर, चौका-चौकात आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. सोशल मीडिया आणि प्रत्यक्षरीत्या मुस्लिम बांधवांनी एकमेकांना, चाँद मुबारक, ईद मुबारक शुभेच्छा दिल्या.

पोलिसांकडून मैदानाचा ताबा

सुरक्षितता कारणास्तव पोलिसांकडून रमजान ईदच्या चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. वाहतूक मार्गातही बदल केले आहेत. ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव नमाजसाठी येत असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी मैदानाचा ताबा घेतला आहे.

वाहतुकीसाठी बंद

ईदगाह मैदान इतर दिवसांत वाहतुकीसाठीही खुले असते. दुचाकी, चारचाकी वाहनधारक वाहतूक कोंडीपासून बचावासाठी या मधल्या मार्गाचा अवलंब करतात. पादचारीही या मार्गाचा वापर करत असल्याने वाहनधारक आणि नागरिकांना रस्ता सोयीचा ठरतो. त्यांच्या वेळेचीही बचत होते. मात्र ईद निमित्त सपाटीकरण केल्याने मैदानास वाहनांमुळे पुन्हा खड्डे पडू नये, यासाठी ईदच्या नमाजपर्यंत मैदान वाहतुकीसाठी बंद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : शेताच्या बांधावर अनवाणी धावणाऱ्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास घडवला; ०.०४ सेकंदाच्या फरकाने जिंकले दुसरे पदक

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

SCROLL FOR NEXT