Slab washed away by flood on Ram Setu Bridge.  esakal
नाशिक

Nashik Ramsetu : ‘रामसेतू’चे भाग्य कधी उजळणार? पुलाचा ताबा जडीबुटी, किरकोळ विक्रेत्यांकडे

सकाळ वृत्तसेवा

Nashik Ramsetu : भूतपूर्व नगराध्यक्ष भय्यासाहेब पांडे यांच्या कार्यकाळात उभा राहिलेला रामसेतू पुलाला सध्या भग्नावस्था प्राप्त झाली आहे.

स्ट्रक्चरल ऑडिटनंतर जीवदान लाभलेल्या या पुलाच्या दुरुस्तीचे काम होत नसल्याने पुलाची दुरवस्था झाली असून, पुलाचा ताबा भटके विक्रेते व फेरीवाल्यांनी घेतल्याने पुलाला ओंगळ स्वरूप प्रात झाले आहे. (Nashik Ramsetu becomes dangerous ignorance of administration nashik news)

शहरातील जुन्या पुलामध्ये रामसेतूची गणना असलेल्या व तब्बल चार महापूर अनुभवलेल्या या पुलाच्या मधोमध मोठे खड्डे पडले आहेत. सिंहस्थात या पुलाचे रुंदीकरण करण्यात आले. परंतु, आता जुना व नवा पूल यात मोठे खड्डे पडल्याने तो धोकादायक बनला आहे.

त्यातच केवळ पायी चालण्यासाठी बनविलेल्या या पुलावरून आता दुचाकींसह रिक्षाही जाऊ लागल्याने त्याच्या दुरवस्थेत दिवसेंदिवस भरच पडत आहे. .

सुरवातीला छोटा असलेल्या या पुलाचे सिंहस्थ कुंभमेळ्यात रुंदीकरण करण्यात आले. रुंदीकरणनंतर या पुलावर कोणत्याही प्रकारच्या वाहनांना मज्जाव होता, त्यामुळे दुतर्फा लोखंडी रेलिंग लावण्यात आले होते.

परंतु भुरट्या चोरट्यांनी ते रेलिंग काढून नेल्याने पुलावर दुचाकींसह रिक्षांचाही बिनदिक्कत वावर सुरू झाला आहे. त्यातच पुलाच्या दोन्ही बाजूचा ताबा भटके विक्रेते, जडीबुटीवाल्यांनी घेतल्याने पुलाला ओंगळ स्वरूप प्राप्त झाले आहे.

मध्यंतरी या पुलावर व्यवसाय करण्यास मज्जाव करण्यात आला होता, आता पुन्हा या पुलाचा ताबा या विक्रेत्यांनी घेतला आहे. या विक्रेत्यांनी पुलाच्या दोन्ही बाजूला बांधलेल्या प्लॅस्टिकमुळे पुलाला ओंगळ स्वरूप प्राप्त झाले आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

झाडे काढण्याची गरज

शहराच्या मध्यवर्ती भागातील जुन्या पुलात गाडगे महाराज पुलाचा समावेश होतो. या पुलावरून शहरात तसेच पंचवटीत जाणे सुलभ होत असल्याने या पुलावर दिवसभर मोठी वर्दळ असते. पुलाच्या पिलरवर मोठ्या प्रमाणावर पिंपळाची झाडे वाढली आहेत. त्याच्या मुळ्या खोलवर गेल्याने पुलाच्या बांधकामालाही धोका निर्माण झाला आहे.

रेलिंग गायब

गोदाघाटाच्या सुशोभीकरणाचे काम सध्या सुरू आहे. स्मार्टसिटीकडून गोदापात्राच्या दुतर्फा नक्षीकाम केलेले दगडी रेलिंग (खांब) बसविण्यात आले आहेत, त्यांना साखळ्या बसविण्याचे काम अद्याप बाकी आहे.

मात्र तत्पूर्वीच अनेक ठिकाणचे खांब तोडून टाकण्यात आले आहे. नागरिकांच्या कराच्या पैशातून उभी राहिलेली अशी कोट्यवधी रुपयांची विकासकामे सांभाळण्याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्‍न यानिमित्ताने उभा राहिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT