Nashik municipal corporation  esakal
नाशिक

निधी खर्चात राज्यात नाशिक सर्वात मागे; खर्चाचे राजकारण जिल्ह्याच्या मुळावर

विनोद बेदरकर

नाशिक : जिल्हा नियोजन समिती (DPDC) म्हणजे विकास कामांच्या अर्थकारणाचा कणा. सरपंचापासून तर गट गणाच्या लोकप्रतिनिधीपर्यत सगळ्यांच्या नजरा या निधीच्या कामाकडे असतात. पण आमदारांमधील राजकीय वादामुळे आर्थिक वर्षात राज्यात आतापर्यतची सगळ्यात खराब परफॉर्मन्स नाशिकचा झाला आहे. निधी खर्चात नाशिकचा क्रमांक राज्यात शेवटचा म्हणजे चक्क ३६ वा आहे. जळगाव जिल्ह्यात राजकारण भोवले. ग्रामविकास मंत्र्याच्या स्थगितीमुळे निधी खर्चात जळगाव ३४ व्या स्थानी राहिले. धुळे २९ व्या स्थानी राहिले. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील कोट्यवधीचा निधी मागील वर्षीच खर्चच होऊ शकला नाही.

निधी खर्चाचे राजकारण जिल्ह्याच्या मुळावर

निधी खर्चाचे राजकारण जिल्ह्याच्या मुळावर उठले असेच साधारण उत्तर महाराष्ट्रातील खानदेशसह नाशिक जिल्ह्यातील चित्र आहे. जिल्हा परिषद (ZP), नगरपालिकांपासून तर गावपातळीपर्यंत अनेक लहान लहान पण नागरिकांच्या जिव्हाळ्याची कामे या निधीतून होतात. पण त्याचे वाटप करताना मात्र राजकारण होते. याची मोहर लागली आहे. काल आर्थिक वर्षाचा अखेर झाला. त्यात राज्यातील सगळ्या ३६ जिल्ह्याचे निधी वाटप पुढे आले. त्यात सुमार कामगिरी नाशिक जिल्ह्याची झाल्याचे स्पष्ट झाले. यात राज्यात नाशिक व जळगाव हे दोनच जिल्हे असे आहेत की, ज्यात प्रणालीच्या तंतोतंत अंमलबजावणीचा परिणाम असे बोलले जात असले तरी राजकीय वाद हेच प्रमुख कारण राहिले.

यापूर्वीही भुजबळ- कांदे वाद

जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात अन्याय होत असल्याचा आरोप करीत, शिवसेनेचे (Shivsena) आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी हरकत घेत, थेट पालकमंत्री छगन भुजबळ (Chhaghan Bhujbal) यांच्या कामकाज पद्धतीवर आक्षेप घेत थेट न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हापासून निधी वाटप चर्चेत आले. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यापासून तर जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. थेट मुख्यमंत्र्यापर्यत हा विषय गेला. भुजबळ हे नाशिकच नव्हे तर राज्याचे बाहुबली नेते आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस- राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेला सोबत घेउन चालताना त्यांच्या कामकाज पद्धतीवर कांदे यांनी प्रश्न उपस्थित केले. निधी खर्चाचे राजकारण होते यावर ३१ मार्चच्या आकडेवारीनंतर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

जळगावला स्थगिती भोवली

जे नाशिकचे तेच जळगावचे झाले. जळगाव जिल्ह्यात निधी खर्चावरून वाद झाला. आधी निधी दिला गेला नंतर पुन्हा परत घेऊन पुन्हा दिला गेला. जिल्हा परिषदेला अगदी शेवटच्या क्षणी कमी वेळ असताना निधी वाटप झाल्याने त्यातून अखर्चिक निधीचे प्रमाण मोठे राहिले. कोरोनासाठी १२० कोटी राखीव ठेवले. त्याचा उशिरा खर्च झाला तर साधारण २०० कोटी जिल्हा परिषदेसाठी असतात तेथे राजकारण रंगले. निधी खर्चाला आक्षेप घेत काही सदस्यांनी तक्रार केली. तक्रारीची दखल घेत ग्रामविकास मंत्र्यांनी स्थगिती दिली. ग्रामविकास मंत्र्यांच्या स्थगितीनंतर उशिराने काम सुरू झाली. जिल्हा परिषदेत भाजपची (BJP) सत्ता आहे तर राज्यात महाविकास आघाडी त्यामुळे निधी खर्चाचे राजकारण होऊन जळगावला त्याचा फटका बसला. कोरोनासाठी निधी उशिराने खर्चाला सुरवात झाली. ही निधी खर्चाची कारणे सांगितली जातात.

अधिकाऱ्यांचे कानावर हात

नाशिक, जळगाव या दोन्ही जिल्ह्यात निधी वाटपातील सूत्र यावरून राजकारण रंगले. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले. आमदारांच्या वादात कशाला पडायचे? अशी सोईस्कर भूमिका घेत, वाद टाळायचे जसं होईल तसे या न्यायाने सौम्य भूमिका बजावल्याने जिल्ह्याच्या कोट्यवधींच्या विकास कामांचा निधी खर्च झाला नाही

जिल्हा निधीचा खर्च (कोटी) टक्के/ राज्यात स्थान

नाशिक ३६१.४८ कोटी ७६.९ ३६

जळगाव ३२६.३७ ८१.६ ३४

धुळे १९७.१८ कोटी ९३.९ २९

नंदुरबार १२३.३३ ९४.९ २७

नगर ५०७.६९ ९९.५ ०८

खर्चातील टॉप थ्री

रायगड २७५. कोटी १०० ०१

गोंदिया १६५ कोटी १०० ०२

सांगली ३१९.९५ १०० ०३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT