Department of Water Resources
Department of Water Resources esakal
नाशिक

Nashik News : पाटबंधारे विभागाकडून 103 कोटींची विक्रमी वसुली

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक पाटबंधारे विभागाने ३१ मार्चअखेर १०३ कोटींची विक्रमी पाणीपट्टी वसुली केली. पाटबंधारे विभागांतर्गत सिंचन व बिगर सिंचन प्रकल्पात पाणीपट्टी आकारली जाते. सिंचन प्रकल्पात शेतकरी पाणीपट्टी रक्कम अदा करतात. बिगर सिंचन प्रकारात १५८ पिण्याच्या पाण्याच्या शासन मंजूर संस्था व ३५ औद्योगिक संस्था अशा एकूण १९३ बिगर सिंचन संस्थांचा समावेश आहे. (Nashik Record recovery of 103 crore from Irrigation department in city marathi news)

यामध्ये प्रामुख्याने नाशिक महापालिका, नगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड, साखर कारखाने अशा संस्थांचा समावेश आहे. सिंचन व बिगर सिंचन प्रकारातील सर्व पाणीपट्टी धारकांचा वेळोवेळी पाठपुरावा व थकबाकीसाठी तगादा लावून वसुली उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे. तसेच अनधिकृत उपसा केल्याबद्दल दंड आकारणी करण्यात व नियमानुसार पाण्याचे मीटर अधिकृतरीत्या बसविण्यात आली.

पाटबंधारे विभाग कार्यालय नाशिकमध्ये सुरू झाल्यापासून सर्वात मोठी पाणीपट्टी वसुली ही ३१ मार्चअखेर झालेली आहे. वसुली करण्यात आलेल्या क्षेत्रांमध्ये प्रामुख्याने गौतमी, गोदावरी, गंगापूर दारणा, कळवा, भोजापूर, मुकणे, वालदेवी, वाकी, नांदूरमध्यमेश्वर बंधारा, भावली व वालदेवी इत्यादी मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. बिगर सिंचन प्रकल्प अंतर्गत ६९५३. ३२ लक्ष उद्दिष्ट होते. (latest marathi news)

त्या बदल्यात १०१२४. ९९ व सिंचन प्रकल्पात वसुली उद्दिष्ट २३७.६९ लक्ष होते तर त्या बदल्यात १७३.७८ लक्ष उद्दिष्ट प्राप्त झाली आहे. एकूण उद्दिष्ट व एकूण प्राप्ती यानुसार १४३ टक्के उद्दिष्ट प्राप्ती झाली आहे. याबाबत अधिक माहिती देताना नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे म्हणाल्या, पाटबंधारे विभाग हा ब्रिटिश काळामध्ये स्थापन झालेला आहे.

या स्वातंत्र्यपूर्व कालावधीत दारणा, नांदूरमध्यमेश्वर बंधारा व गोदावरी उजवा व डावा कालवा निर्माण करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर गंगापूर हे पहिल्या मातीच्या धरणाची निर्मिती करण्यात आली. नाशिक पाटबंधारे विभागांतर्गत नाशिक व नगर जिल्ह्यामध्ये सुमारे १० मोठे व मध्यम, ३४ लघु प्रकल्प व गोदावरी नदीवरील १० बंधारे या सर्व प्रकल्पांचे सिंचन व्यवस्थापन व देखभाल दुरुस्तीचे कामकाज योग्य प्रकारे सुरू आहे.

विक्रमी वसुली संकलित झाली. यासाठी नाशिक विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता व प्रशासक महिंद्र आमले, उपविभागीय व शाखा अभियंता, कालवा निरीक्षक, मोजणीदार, दप्तर कारकून,विभाग व उपविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळल्याने खळबळ, बॉम्ब शोधक पथक दाखल

Arvind Kejriwal: जेल की बेल! केजरीवालांचा तरुंगाबाहेर शेवटचा दिवस, आजची सुनावनी ठरवणार 'आप'चे भविष्य

Indian Typing Man : भारताचा टायपिंग मॅन! तिसऱ्यांदा गिनीज बुकमध्ये नोंद करत स्वतःचा रेकॉर्ड मोडला, पाहा व्हिडिओ

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT