Nashik recorded the lowest temperature of the season 
नाशिक

सलग तिसऱ्या दिवशी नाशिककर गारठले! हंगमातील निच्चांकी तापमानाची नोंद 

सकाळवृत्तसेवा

नाशिक :  जिल्ह्यासह शहरात गेल्या काही दिवसांपासून पारा घसरला आहे. रविवारपासून जोरदार थंड वारे वाहू लागल्याने वातावरणातील गारठा वाढल्याचा अनुभव नाशिककर घेत आहेत. आज ८.२ इतके तापमान नोंदविले गेले असून हंगमातील ते नीचांकी तापमान आहे. 

थंड हवामानाबरोबरच हलक्या सरींचा अनुभव नाशिककर गेल्या काही दिवसांपासून घेत आहेत असतानाच मागील चार दिवसांपासून निरभ्र आकाशाबरोबरच लख्ख सुर्यप्रकाशाचा अनुभव नाशिककर घेत असतानाच गेल्या तीन दिवसांपासून तापमानात सातत्याने घट होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील घराघरात शेकोट्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शहरातील तापमानात गत तीन दिवसांपासून विक्रमी घट होत असतानाच उत्तरेकडून आलेल्या शीतलहरींमुळे त्यात घटच होत आहे. हा गारठा अजूनही वाढू शकतो, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. दोन वर्षांपूर्वी शहराचा पारा ५अंश सेल्सियसपर्यंत घसरला होता. यंदाही त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. 
 


उबदार कपड्यांना मागणी 

थंडीचा कडाका वाढल्याने उबदार कपड्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे स्वेटर्स व अन्य उबदार कपडे खरेदीसाठी झुंबड उडत आहे. उबदार कपड्यांसाठी शऱणपूर रोडवरील तिबेटियन मार्केटसह शालिमार चौक, मेनरोड याठकाणी जोरदार खरेदी सुरू आहे. 

शेकोट्यांत वाढ 

सातत्याने घसरणा-या पा-यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातही सायंकाळनंतर शुकशुकाट होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात घराच्या अंगणात तर शहरी भागात घराघरात छोट्यामोठ्या शेकोट्या पेटू लागल्या आहेत. त्यासाठी जळावू लाकडांसह कोळशाचा वापर जात आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : रेपणपल्लीच्या जंगलात एसटी बस पडली बंद; 40 प्रवाशांवर रस्त्यावर रात्र काढण्याची वेळ

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT