Free Textbook Scheme esakal
नाशिक

Free Textbook Scheme : मोफत सव्वा लाख पाठ्यपुस्तकांची नोंदणी; महापालिका हद्दीतील 304 शाळांकडून मागणी

Nashik News : महापालिका क्षेत्रात ३०४ शाळांमधून पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांना १ लाख १४ हजार ८९५ इतक्या पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राज्य शासनाने सुरू केलेल्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत महापालिका क्षेत्रात ३०४ शाळांमधून पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांना १ लाख १४ हजार ८९५ इतक्या पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. पाठ्यपुस्तकांपासून विद्यार्थी वंचित राहू नये, विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी होऊन शंभर टक्के उपस्थिती राहावी या उद्देशाने राज्य शासनाने समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके योजना सुरू केली आहे. (Free Textbook Scheme)

योजनेंतर्गत पहिली ते आठवीच्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. महापालिका शिक्षण विभागाने पहिली ते आठवीपर्यंतच्या शासकीय, खासगी अनुदानित शाळांमधील अशा मराठी.

हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती माध्यमाच्या ३०४ शाळांसाठी सव्वा लाख पुस्तकांची मागणी नोंदविली आहे. २६६ मराठी, तर उर्दू माध्यमाच्या २४ शाळांचा समावेश आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली जाणार आहे.

माध्यमनिहाय मागणी

मराठी- १,०१७३४

हिंदी - २,८१८

उर्दू - ७,८८३

इंग्रजी - १,९९५

गुजराती - ४६५

इयत्तानिहाय मागणी

पहिली - ११,९७७

दुसरी - १३,००५

तिसरी - १४,६३५

चौथी - १५,३३९

पाचवी - १४,५६३

सहावी - १४,८२३

सातवी - १५,०९५

आठवी - १५,४५८

शालेय गणवेशाला विलंब

लोकसभा निवडणुकीच्या कामात कर्मचारी व्यस्त असल्याने विद्यार्थ्यांची माहिती देता आली नाही. त्यामुळे गणवेश प्राप्त होण्यास मात्र विलंब होणार असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या २७,०८७ आहे. अनुसूचित जाती व जमातीचे विद्यार्थी तसेच सर्व मुलींना सर्व शिक्षा अभियानांतर्गत दोन गणवेश देण्याची तरतूद आहे. (latest marathi news)

परंतु यंदाच्या वर्षांपासून शासनाकडून सरसकट सर्व विद्यार्थ्यांना गणवेषासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला. परंतु शासनाकडून फक्त गणवेशाचे अनुदान प्राप्त होणार आहे. परंतु त्यापूर्वी शाळांना विद्यार्थ्यांची संख्या शासनाला कळवावी लागेल. लोकसभा निवडणुकीमुळे विद्यार्थ्यांची संख्या कळविता आली नाही.

त्यामुळे शासनाकडून अनुदान प्राप्त झाले नाही. विद्यार्थ्यांची माहिती पाठवून निधी मिळविता येईल. निधी प्राप्त झाल्यानंतर व्यवस्थापन समितीला दिला जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना लवकरात लवकर शालेय गणवेश देण्याचा प्रयत्न असल्याचे शिक्षणाधिकारी बी.टी. पाटील यांनी सांगितले.

गणवेशाचे लाभार्थी विद्यार्थी

- एकूण मुली- १४,३८३

- अनुसूचित जाती- ३,६६१

- अनुसूचित जमाती- २,४६२

- इतर- ७,०४२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Drop : वर्षाचा शेवट गोड! सोने-चांदी दरात घसरण, नवीन वर्षात सोन्या चांदीचे भाव जाणून घ्या

Mumbai Rain: मुंबईत २०२६ ची सुरुवात आश्चर्याने! थंडीच्या काळात पावसाची एंट्री

Latest Marathi News Live Update : कृष्णेकाठी वसलेल्या साताऱ्यात आजपासून सारस्वतांचा मेळा भरणार

2026 मध्ये OTT वर धुमाकूळ घालायला येताय नव्या सीरिज, प्रेम, ड्रामा, थ्रिल आणि अ‍ॅक्शनने भरलेली ही यादी, एकदा नक्की वाचा!

Pune Municipal Election : धोकादायक २१ जागांनी वाढविली चिंता; २०१७ मध्ये एक हजारापेक्षा कमी मतांनी जिंकलेल्या जागांवर लक्ष

SCROLL FOR NEXT